मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.
"आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल, वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
रॉकफेलरचे अध्यक्ष डॉ. शाह यांच्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्राहक सेवा उन्नत करण्याकरिता आणि कालांतराने महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता एआय-आधारित निर्णय-सहाय्यक साधने अत्यंत उपयुक्त आहेत. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतील, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीन' पद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नाविन्यपूर्ण एआय -आधारित उपक्रमातून शाश्वत पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी ग्रामीण भागात मोठे बदल होतील.
No comments:
Post a Comment