ऊर्जा क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन
- अमेरिकेच्या 'द रॉकफेलर फाउंडेशन', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट' व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम
मुंबई, दि. ४ :- राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीन' पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपी' आणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे.
No comments:
Post a Comment