Thursday, 4 December 2025

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना 20 डिसेंबरपर्यंत बंदी

 सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला

मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना 20 डिसेंबरपर्यंत बंदी

 

 मुंबईदि. 02 (रानिआ): राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीतअसेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी 24 तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (उदा. गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्हीसुरक्षा आलार्म सिस्टीमअग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यांन्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे द्वारे दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावीअसेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झालेतसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शूटिंग स्टार्स उपक्रम बाबत

 या उपक्रमाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. टॅलेंट आयडेंटिफिकेशन (प्रतिभा शोध): ग्रामीण आणि शहरी भागातील लहान खेळाडूंना शोधून त्यांना संधी देणे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षणः वैज्ञानिक कोचिंगफिटनेसमानसिक आधारतांत्रिक प्रशिक्षण अशा सर्व सुविधा देणे. दीर्घकालीन खेळाडू विकासः शिक्षणपोषणमार्गदर्शनआणि निवासी प्रशिक्षणाच्या मदतीने मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

 

हा उपक्रम क्रीडा व युवक कल्याण  मंत्री ॲड. मणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालीतसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनवेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे.

 

या बहुपदरी निवड प्रक्रियेत गावपातळीवरून 10,000 हून अधिक U-13 मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता. त्यातून 120 खेळाडूंनी राज्यस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता यातील 60 मुलांची पाच वर्षांच्या निवासी शिष्यवृतीसाठी निवड होणार आहे. या शिष्यवृत्तीत उच्च दर्जाचे प्रशिक्षणशिक्षणपोषण आणि 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेसी यांच्या खास फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

 

'शूटिंग स्टार्स 2025हा सामना या सर्व तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा देणार असूनमहाराष्ट्राच्या तळागाळातील फुटबॉल व्यवस्थेच्या भक्कम बांधणीसाठी राज्याची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.

शूटिंग स्टार्स 2025' सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे 5 डिसेंबर रोजी आयोजन

 शूटिंग स्टार्स 2025सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे 5 डिसेंबर रोजी आयोजन

 

मुंबईदि. 2 : 'शूटिंग स्टार्स 2025हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी  आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफसिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महादेवाच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे.

 

प्रोजेक्ट महा- देव हा महाराष्ट्रातील U-13 वयोगटासाठीचा पहिलाच असा राज्यस्तरीय उपक्रम आहेज्याचा उ‌द्देश भारतीय संघासाठी भविष्याचे उत्तम फुटबॉलपटू तयार करणे हा आहे. 2034 च्या FIFA विश्वचषकासाठी भारताच्या संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातून असावेतहे या उपक्रमाचे ध्येय आहे.

माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा

 माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा

शासनाचे लोकराज्य मासिक हे अतिशय माहितीपूर्ण आणि संग्रही मासिक आहे. डिजीटल स्वरुपातही माहिती जनतेला मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. शासकीय माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारा खरा वाहक म्हणून विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी. सत्यता विश्वसनीयतापारदर्शकता आणि गतीमानता ही जनसंपर्क विभागाची ओळख बनली पाहिजेअसे फडणीस यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विविध विषायावर श्री. फडणीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी यांनी श्री. फडणीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचलन विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे यांनी केले तर आभार वरिष्ठ सहायक संचालक काशीबाई थोरात यांनी मानले.

राज्यांच्या गुंतवणुकीचे उदाहरण

 राज्यांच्या गुंतवणुकीचे उदाहरण

केरळउत्तर प्रदेशतामिळनाडू यांसारख्या अनेक राज्यांनी शासकीय माध्यमात मोठी गुंतवणूक करून पर्यटनउद्योग व शासन व्यवस्था यांची प्रभावी प्रसिद्धी केली आहे. महाराष्ट्र हे मूलतः विकसित राज्य असल्याने पर्यटनउद्योगसंस्कृती आणि शासन प्रगती यांची देशातील इतर राज्यात प्रभावी प्रसिद्धी करण्यावर भर द्यावाअसेही फडणीस यांनी यावेळी सांगितले.

क्रिएटिव्हिटी, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रभावी कंटेंट यांचे महत्त्व

 क्रिएटिव्हिटीप्रॉडक्टिव्हिटी आणि प्रभावी कंटेंट यांचे महत्त्व

जनतेपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती प्रभावीआकर्षक आणि क्रिएटिव्ह असणे अत्यावश्यक आहे. मनोरंजनाच्या स्वरूपात दिली जाणारी माहिती अधिक लक्षवेधी ठरतेत्यामुळे विभागाने माहिती सादरीकरणाचा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाची प्रॉडक्टिव्हिटी चारपट वाढणार असूनडिजिटल साधनांचा वापर हे यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेलअसेही फडणीस यांनी सांगितले.

स्वतंत्र ॲप आणि स्वतःचा डेटा-बेस आवश्यक

 स्वतंत्र ॲप आणि स्वतःचा डेटा-बेस आवश्यक


माहिती व जनसंपर्क विभागाने आपले स्वतंत्र आधुनिक ॲप विकसित करून त्याद्वारे शासकीय माहिती, प्रसिद्धिपत्रके, धोरणात्मक घोषणा आणि जनजागृती मोहीमा थेट जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. स्वतःचा डेटा-बेस तयार केला तर माहिती अधिक जलद व अचूक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल, असेही फडणीस यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi