शूटिंग स्टार्स 2025' सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे 5 डिसेंबर रोजी आयोजन
मुंबई, दि. 2 : 'शूटिंग स्टार्स 2025' हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महादेवाच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे.
प्रोजेक्ट महा- देव हा महाराष्ट्रातील U-13 वयोगटासाठीचा पहिलाच असा राज्यस्तरीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतीय संघासाठी भविष्याचे उत्तम फुटबॉलपटू तयार करणे हा आहे. 2034 च्या FIFA विश्वचषकासाठी भारताच्या संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातून असावेत, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.
No comments:
Post a Comment