माहिती व जनसंपर्क विभाग – शासनाचा खरा दुवा
शासनाचे लोकराज्य मासिक हे अतिशय माहितीपूर्ण आणि संग्रही मासिक आहे. डिजीटल स्वरुपातही माहिती जनतेला मिळेल यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. शासकीय माहिती जनतेपर्यंत पोहोचवणारा खरा वाहक म्हणून विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी. सत्यता विश्वसनीयता, पारदर्शकता आणि गतीमानता ही जनसंपर्क विभागाची ओळख बनली पाहिजे, असे फडणीस यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विविध विषायावर श्री. फडणीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी यांनी श्री. फडणीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचलन विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे यांनी केले तर आभार वरिष्ठ सहायक संचालक काशीबाई थोरात यांनी मानले.
No comments:
Post a Comment