Thursday, 4 December 2025

शूटिंग स्टार्स उपक्रम बाबत

 या उपक्रमाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. टॅलेंट आयडेंटिफिकेशन (प्रतिभा शोध): ग्रामीण आणि शहरी भागातील लहान खेळाडूंना शोधून त्यांना संधी देणे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षणः वैज्ञानिक कोचिंगफिटनेसमानसिक आधारतांत्रिक प्रशिक्षण अशा सर्व सुविधा देणे. दीर्घकालीन खेळाडू विकासः शिक्षणपोषणमार्गदर्शनआणि निवासी प्रशिक्षणाच्या मदतीने मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

 

हा उपक्रम क्रीडा व युवक कल्याण  मंत्री ॲड. मणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालीतसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनवेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे.

 

या बहुपदरी निवड प्रक्रियेत गावपातळीवरून 10,000 हून अधिक U-13 मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता. त्यातून 120 खेळाडूंनी राज्यस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता यातील 60 मुलांची पाच वर्षांच्या निवासी शिष्यवृतीसाठी निवड होणार आहे. या शिष्यवृत्तीत उच्च दर्जाचे प्रशिक्षणशिक्षणपोषण आणि 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेसी यांच्या खास फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

 

'शूटिंग स्टार्स 2025हा सामना या सर्व तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा देणार असूनमहाराष्ट्राच्या तळागाळातील फुटबॉल व्यवस्थेच्या भक्कम बांधणीसाठी राज्याची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi