Thursday, 14 August 2025

दौंड, फुलंब्री, खेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचा आढावा

 दौंडफुलंब्रीखेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचा आढावा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज सह्याद्री अतिथी गृह येथे दौंडफुलंब्रीखेड-आळंदी मतदार संघातील जलसिंचनाच्या कामाचाही आढावा घेतला. या यावेळी आमदार राहुल कुलआमदार श्रीमती अनुराधा चव्हाणआमदार बाबाजी काळे उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे महत्वाचे असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेसिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत व दर्जेदार झाली पाहजेत. निकृष्ट काम करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही.

कालवा वितरण व्यवस्थाकोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण या  विषयी बैठकीत चर्चा करण्यात येऊन या कामांबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

 ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा

- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. १३ :-  ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ मधील अस्तित्वात असलेल्या घटकांचा वापर करून प्रस्तावित १३ गावांच्या योजनेचे संकल्पन तातडीने पूर्ण करावे. तदनंतर या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी दिली जाईल असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ (ता. शेवगाव जि. अहिल्यानगर)  या बंद असलेल्या योजनेच्या शिल्लक असलेल्या पाण्यातून शेवगाव पाथर्डी मतदार संघातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावांचा समावेश करून योजना पुनश्च सुरू करणे संदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार श्रीमती मोनिका राजळेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.

ताजनापूर टप्पा-१ चालू करुन त्यामध्ये अतिरिक्त १३ गावांचा समावेश करणेबाबतच्या प्रस्तावास शासनाची तत्वतः मान्यता प्राप्त  आहे. या योजनेद्वारे शेवगाव तालुक्यातील १३ गावातील  साठवण तलाव व बंधारे गुरूत्वीय पाईप वितरण प्रणालीव्दारे भरून देणे नियोजित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-२ मधील कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला.

क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

 क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा

तत्पूर्वी पलूस (जि. सांगली) तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी उपाय योजनांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली  या बैठकीस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते.

क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सुधारित मापदंड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी पाटबंधारे महामंडळांनी क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावाअशा सूचना या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पाण्याचा निचरा न झाल्याने जमिनी क्षारपड प्रमाण वाढते ही चिंतेची बाब आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी निचरा कॅनॉल स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळस्तरावर सर्वसमावेशक योजना राबवावीअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. या बैठकीत  कडेगांव (जि. सांगली) तालुक्यातील ढाणेवाडी गावास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला

नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा; कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

 नीरा देवधर प्रकल्पगुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा;

कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

 

मुंबईदि. 13 :- नीरा देवधर प्रकल्पगुंजवणी-चापेट प्रकल्पवरसगावपानशेत व मुळशी धरण प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटीलग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेमाजी आमदार संग्राम थोपटेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकार्यकारी संचालक  श्री. गुणालेमुख्य अभियंता श्री. धुमाळमुख्य अभियंता श्री. मिसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेवाजेघरवांगणीशिवगंगा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू केली जातील. नीरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्यात असून तेही लवकरच पूर्ण होईलअसेही त्यांनी सांगितले.

वरसगावपानशेत व मुळशी धरण प्रकल्प बाधितांच्या समस्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभागाने या ठिकाणच्या गावठाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचाघेतला आढावा

 कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 13 :- कोकण व गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  आढावा घेऊन या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेकोकण पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेजलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या  सर्वेक्षणाची प्रगती व तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले,

या प्रकल्पाद्वारे कोकणातील जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करून गोदावरी खोऱ्यातील पाणी टंचाई भागांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण काम गतीने करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाअशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितलेमराठवाड्याच्या दुष्काळी भागाच्या कृषी व औद्योगिक विकासासाठी हा  प्रकल्प महत्त्वाचा असल्याने दिलेल्या वेळेतच या प्रकल्पाच्या सर्वेक्षण काम व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी याचा नियमित आढावा घ्यावा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या

शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

 शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. १२ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊसदर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक झाली. बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (ऑनलाईन)सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासाखर आयुक्त सिद्धराम सालीमठसाखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच आमदार व साखर संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंके उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे एफआरपी दरानेच ऊसदर मिळावाअशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना कायद्याने ठरवून दिलेला किमान दर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनांनुसार राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दर अदा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहेअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

000

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत

 मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत

भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती

 

मुंबईदि. १३ : मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावीत. महामार्गावरील इंदापूर - माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी लागणाऱ्या २१ कोटींचा निधी उपलब्ध करणार असून, ही कामे तातडीने पूर्ण करावीत. मुंबई-गोवा महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            मंत्रालयात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव डॉ.राजगोपाल देवरा यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-गोवा महामार्गाची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमून मुंबई-गोवा महामार्गाची चौपदीकरणाची कामेरस्त्यातील खड्ढे भरणे,विविध ठिकाणी माहितीपूर्ण दिशादर्शक फलक लावणे,पूलांची कामे महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारणे, दर चाळीस किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था यासह इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे.

विभागाने रस्त्यातील धोकादायक असलेले खड्डे तत्काळ भरुन घेण्यासाठी विशेष दोन अधिकारी यांची नियुक्ती करावी. नागरिकांना या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीगणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरून  मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जातात. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने मोठी बांधकामाची कामे ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतील अशी थांबवावीत. जिथे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अशी ठिकाणे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग प्रशासनाने पाहणी करून तिथे वाहतूकीचे काटेकोरपणे नियोजन करावे. अवजड वाहने तसेच इतर वाहतुकीचे नियोजन करावे. घाट रस्ते तसेच वळणाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. वैद्यकीय सोयी सुविधा यांची देखील स्थानिक प्रशासनाने सोय करावी.

            यावेळी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशीरायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळेरायगडच्या पोलीस अधक्षक आंचल दलालपोलीस अधक्षक वाहतूक राष्ट्रीय महामार्ग तानाजी चिखलेकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडेभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तवराष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता कोकण भवन संतोष शेलारराष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधक्षक अभियंता तृप्ती नागरायगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधक्षक अभियंता सुषमा गायकवाडजनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादवरावबळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालमप्रकाश भांगरथ यावेळी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi