Thursday, 3 July 2025

विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शाळांच्या अडचणीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार

 वृत्त क्र. ३८

विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शाळांच्या अडचणीसंदर्भात

 धोरणात्मक निर्णय घेणार

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. २ : विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शाळांच्या अडचणी संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून या भागातील सर्व शाळांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईलअसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती.

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा,इमारतखेळाचे मैदानजागा आणि विद्यार्थ्यांना असणाऱ्या आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी गठीत समितीच्या अहवालानुसार धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधीमध्ये मुरजी पटेलमनीषा चौधरी, ज्योती गायकवाड यांनी चर्चेत सहभागी घेतला.

महापालिका वसाहतीमधील सदनिका संदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करणार

 महापालिका वसाहतीमधील सदनिका संदर्भात

 उच्चस्तरीय समिती गठीत करणार

-         उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 2 महानगरपालिका हद्दीतील चेंबूर घाटलामिठानगरमालवणीदेवनारपार्क साईट विक्रोळीबर्वेनगर घाटकोपर या महापालिका वसाहतीमधील अनुज्ञा व अनुमती तत्वावर दिलेल्या बैठ्ठ्या खोल्या मालकी तत्वावर करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मच्याऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचा निकाल या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आला आहे. यासंदर्भात उच्च स्तरीय समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानससभेत सांगितले.

विधानसभा सदस्य तुकाराम काते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री उदय सामंत म्हणाले कीसदनिकांवरील मालकी हक्कन्यायालयीन आदेश आणि पुनर्वसन योजनेतील सहभाग अशा सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीतकरून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री. सामंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

सदस्य सुनील प्रभूसना मलिकयोगेश सागर हे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

विधानसभा लक्षवेधी सूचना : शिराळा नागपंचमी संदर्भात केंद्रीय वन मंत्र्यांसोबत बैठक

 विधानसभा लक्षवेधी सूचना :

शिराळा नागपंचमी संदर्भात केंद्रीय वन मंत्र्यांसोबत बैठक

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबई‍‍दि. २ : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दरवर्षी नागपंचमीच्या सणानिमित्त नागधामण यासारख्या जिवंत सर्पांची पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिराळा येथील पारंपरिक नागपंचमी साजरी करण्याच्या परंपरेबाबत नागरिकांच्या भावना आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदी  या पार्श्वभूमीवर केंद्रीय वन मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे असे वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सत्यजित देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य जयंत पाटीलअर्जुन खोतकरगोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री. नाईक म्हणालेमा. उच्च न्यायालयाने २००३ व २०१४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने समिती गठीत करून राज्य कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला २६ फेब्रुवारी २०१५ रोजी शासन मान्यता मिळाली असून दरवर्षी नागपंचमीस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातात.

००००

Wednesday, 2 July 2025

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी

नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग

·        नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

 

 मुंबईदि. २ गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत. या कायद्यांअंतर्गत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर अपेक्षित असून न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच राज्यात नवीन फौजदारी संहिता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय  कामाचे रँकिंग करण्याच्या सूचनाही दिल्या.

विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत आढावा घेताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. बैठकीला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदमगृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेनवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.  न्यायवैद्यक विभागाने  गुन्हे सिध्दतेसाठी पुराव्यांच्या करण्यात येणाऱ्या चाचण्या वेळेत कराव्यात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रिक्त पदे भरली असून आणखी  मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास मागणी करावी.  सुविधा व नागरिक केंद्रित सेवा यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आघाडीवर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील पोलीस अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणांचे नियमित अंतराने आयोजन करण्यात यावे. मास्टर ट्रेनर्स तयार करून  न्यायालयीन अधिकारीकारागृह कर्मचारीफॉरेन्सिक वकिलांसाठीही प्रशिक्षण देण्यात यावे. ऑनलाईन ‘एफआयआर’ प्रणालीवर नागरिक सहजपणे तक्रार नोंदवू शकतील याबाबत काम करावे. ई साक्ष अॅपसीसीटीएनएस प्रणाली याचा उपयोग वाढविण्यात यावा. गुन्हे सिद्धता वाढण्यासाठी ई न्यायालय प्रणाली सक्षम करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी.  विशेषतः छेडछाड व अत्याचाराच्या  प्रकरणांचा तपास  जलदगतीने पूर्ण करावा. आरोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीगृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहलपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाप्रधान सचिव (अपील व सुरक्षा) राधिका रस्तोगीप्रधान सचिव (कायदा व सुव्यवस्था) अनुप कुमार सिंह, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवलेमहासंचालक (न्यायवैद्यक) संजय कुमार वर्माअपर पोलीस महासंचालक (कारागृह) सुहास वारके यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या 1 लाख 35 हजार 371 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

 थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या

1 लाख 35 हजार 371 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        तांत्रिक नवकल्पनासंशोधनविकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार

मुंबईदि. २ : राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आज उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या एक लाख 35 हजार 371 कोटी 58 लाख (१,३५,३७१.५८ कोटी)  रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे 1 लाख  प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पनासंशोधनविकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            उद्योग विभागातंर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत व थ्रस्ट सेक्टरच्या धोरणांतर्गत प्रोत्साहने मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची १२ वी बैठक आज विधानभवनातील मंत्रिमंडळ समिती सभागृहात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्य सचिव राजेशकुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावस्त्रोद्योग विभागाच्या सचिव ए शैलाउद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगनविकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहऔद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासूआदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये एकूण १९ मोठेविशाल व अतिविशाल प्रकल्पांना प्रकल्पातील गुंतवणूक व रोजगारनिर्मिती विचारात घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये सेमीकंडक्टरसिलीकॉनइग्नॉट आणि वेफर्ससेल आणि मॉडयुलइलेक्ट्रीक वाहनांची साहित्यनिर्मितीलिथियम आर्यन बॅटरीअवकाश व संरक्षण साहित्य निर्मितीवस्त्रोद्योगहरित स्टील प्रकल्पग्रीन फिल्ड गॅस टू केमिकल इ. उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक राज्यात येत असूनत्याद्वारे राज्यात आगामी कालावधीत अंदाजे एकूण १ लाख एवढी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

यामध्ये उद्योगांना भांडवली अनुदानवीज दर सवलतव्याजदर सवलतऔद्योगिक प्रोत्साहन अनुदानस्वामित्व धन परतावाराज्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी परताव्यामध्ये सवलतकर्मचारी प्रॉव्हिडंट फंड परतावा आदी सवलती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची संख्या २२ वरून ३० पर्यंत वाढविणेरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील दापचारी व वंकास येथील जमिन संपादन करून वाटप करणेतसेच "कोल गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेरीव्हेटीज" या उत्पादनाचा समावेश दि.२२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये करून त्यांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यास मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आज मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमध्ये नवी मुंबईतील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीनागपूरमधील ज्युपिटर रिन्यूएबल प्रा.लि.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमे. बीएसएल सोलार प्रा.लिमे. श्रेम बायो फ्यूएल .लि.पुण्यातील ह्युंदाई मोटार इंडियायुनो मिंडा अँटो इनोव्हेशन प्रा.लिएअर लिक्विड इंडिया होल्डिंग प्रा. लिं.रायगडमधील एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि.बालासोर अलॉयज लिगडचिरोलीतील सुरजागड इस्पात प्रा.लि.सुफलाम इंडस्ट्रीज लिसुफलाम मेटल प्रा.लि. किर्तीसागर मेटालॉय प्रा.लि.नंदूरबारमधील मे. जनरल पॉलिफिल्मस प्रा.लिछत्रपती संभाजी नगरमधील एनपीएसपीएल अडव्हान्सड मटेरियल्स प्रा.लिगोंदियातील सुफलाम इंडस्ट्रिज लि.साताऱ्यातील मे. वर्धन अँग्रो प्रोसेसिंग लिसोलापूरमधील मे. आवताडे स्पिनर्स प्रा. लि या कंपन्यांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पनासंशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. राज्यात या प्रकल्पामुळे सेमी कंडक्टरस्टील प्रकल्पइलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्था व एकत्रितपणे राज्याच्या विकासाला होऊन तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. तसेच रोजगार क्षमता व उद्योन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होईल.

०००००

वसई - विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करण्यासाठी १३२ केव्ही उपकेंद्र

 वसई - विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांना

वीज पुरवठा करण्यासाठी १३२ केव्ही उपकेंद्र

- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. २ : वसई - विरार महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांच्या पंपिंग स्टेशनला वीज पुरवठा करणारी वाहिनी जंगलातून जाते. त्यामुळे वादळी वारे व अति पावसामुळे तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. वसई - विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनांना वीज पुरवठा करण्यासाठी १३२ केव्ही अति उच्चदाब उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्यात येईलअसे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

 वसई - विरार महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपुरवठा योजनांच्या वीज पुरवठ्याबाबत सदस्य श्रीमती स्नेहा दुबे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

उत्तरात ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्यासूर्यानगर आणि कवडास येथील पाणीपुरवठा योजनांसाठी उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या १५३ पैकी १०३ मनोरे पूर्ण करण्यात आले आहे. वीज वाहिनीसाठी ३४.५ किलोमीटर तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी एप्रिल २०२५ मध्ये वन विभागाची परवानगी मिळाली आहे. वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यासपाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्याची बाब तपासून घेण्यात येईल.

सूर्या धरणाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सूर्यनगर व कवडास येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मागणी नुसार महापारेषण कंपनीतर्फे मंजूर उपकेंद्राचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदर अतिउच्च दाब उपकेंद्र कार्यान्वित होण्यास अवधी लागत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी सूर्यनगर व कवडस येथे डहाणू उपकेंद्रातून वीज पुरवठा देण्यात आला आहेअसेही ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार

 बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरणचौकशीसाठी समिती गठीत

समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. २ : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका बालसुधारगृहातील नऊ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केल्याची घटना ३० जून २०२५ रोजी घडली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल सात दिवसात येणार असून हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईलअसे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्य च्या मुद्द्यावर निवेदन करताना मंत्री तटकरे बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीया घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारीबालकल्याण समिती व इतर अधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी संस्थेला भेट देत चौकशी केली. तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्यानंतर बालगृहातील नऊ मुलींनी पलायनाचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर सात मुलींना पोलीस व दामिनी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलेदोन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी सापडली असून एक मुलगी अद्यापही फरार आहे. पाच मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असूनइतर तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. संस्थेतील अधीक्षक बदलण्यात आला असूनबालगृह व्यवस्थापन व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असूनसंबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले . 

Featured post

Lakshvedhi