वृत्त क्र. ३८
विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शाळांच्या अडचणीसंदर्भात
धोरणात्मक निर्णय घेणार
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. २ : विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शाळांच्या अडचणी संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून या भागातील सर्व शाळांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली होती.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा,इमारत, खेळाचे मैदान, जागा आणि विद्यार्थ्यांना असणाऱ्या आवश्यक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी गठीत समितीच्या अहवालानुसार धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
या लक्षवेधीमध्ये मुरजी पटेल, मनीषा चौधरी, ज्योती गायकवाड यांनी चर्चेत सहभागी घेतला.
No comments:
Post a Comment