Wednesday, 2 July 2025

थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या 1 लाख 35 हजार 371 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

 थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांच्या

1 लाख 35 हजार 371 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        तांत्रिक नवकल्पनासंशोधनविकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार

मुंबईदि. २ : राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आज उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या एक लाख 35 हजार 371 कोटी 58 लाख (१,३५,३७१.५८ कोटी)  रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे 1 लाख  प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पनासंशोधनविकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            उद्योग विभागातंर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत व थ्रस्ट सेक्टरच्या धोरणांतर्गत प्रोत्साहने मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची १२ वी बैठक आज विधानभवनातील मंत्रिमंडळ समिती सभागृहात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्य सचिव राजेशकुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावस्त्रोद्योग विभागाच्या सचिव ए शैलाउद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगनविकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाहऔद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासूआदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये एकूण १९ मोठेविशाल व अतिविशाल प्रकल्पांना प्रकल्पातील गुंतवणूक व रोजगारनिर्मिती विचारात घेऊन त्यांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये सेमीकंडक्टरसिलीकॉनइग्नॉट आणि वेफर्ससेल आणि मॉडयुलइलेक्ट्रीक वाहनांची साहित्यनिर्मितीलिथियम आर्यन बॅटरीअवकाश व संरक्षण साहित्य निर्मितीवस्त्रोद्योगहरित स्टील प्रकल्पग्रीन फिल्ड गॅस टू केमिकल इ. उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक राज्यात येत असूनत्याद्वारे राज्यात आगामी कालावधीत अंदाजे एकूण १ लाख एवढी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

यामध्ये उद्योगांना भांडवली अनुदानवीज दर सवलतव्याजदर सवलतऔद्योगिक प्रोत्साहन अनुदानस्वामित्व धन परतावाराज्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी परताव्यामध्ये सवलतकर्मचारी प्रॉव्हिडंट फंड परतावा आदी सवलती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची संख्या २२ वरून ३० पर्यंत वाढविणेरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील दापचारी व वंकास येथील जमिन संपादन करून वाटप करणेतसेच "कोल गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेरीव्हेटीज" या उत्पादनाचा समावेश दि.२२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये करून त्यांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यास मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

आज मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमध्ये नवी मुंबईतील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीनागपूरमधील ज्युपिटर रिन्यूएबल प्रा.लि.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमे. बीएसएल सोलार प्रा.लिमे. श्रेम बायो फ्यूएल .लि.पुण्यातील ह्युंदाई मोटार इंडियायुनो मिंडा अँटो इनोव्हेशन प्रा.लिएअर लिक्विड इंडिया होल्डिंग प्रा. लिं.रायगडमधील एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि.बालासोर अलॉयज लिगडचिरोलीतील सुरजागड इस्पात प्रा.लि.सुफलाम इंडस्ट्रीज लिसुफलाम मेटल प्रा.लि. किर्तीसागर मेटालॉय प्रा.लि.नंदूरबारमधील मे. जनरल पॉलिफिल्मस प्रा.लिछत्रपती संभाजी नगरमधील एनपीएसपीएल अडव्हान्सड मटेरियल्स प्रा.लिगोंदियातील सुफलाम इंडस्ट्रिज लि.साताऱ्यातील मे. वर्धन अँग्रो प्रोसेसिंग लिसोलापूरमधील मे. आवताडे स्पिनर्स प्रा. लि या कंपन्यांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पनासंशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. राज्यात या प्रकल्पामुळे सेमी कंडक्टरस्टील प्रकल्पइलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्था व एकत्रितपणे राज्याच्या विकासाला होऊन तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळेल. तसेच रोजगार क्षमता व उद्योन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होईल.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi