Friday, 7 February 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम

अभिरुप स्वरुपात राजवर्धन कारंडे यांनी सांभाळले कौशल्य विकास मंत्री पद

 

मुंबईदि. 6 : युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी प्रथमच दिली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

 अभिरुप स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांचे आभार मानून नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिरुप स्वरूपात सोपवण्यात आला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात आणि प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहितीत्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचाविभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे  मंत्रिमंडळ समृद्धी तुपे - मुख्यमंत्रीरिया खानोलकर - गृहमंत्री, पार्थ थोरवत, आर्यन दराडे - उपमुख्यमंत्रीपर्णवी धावरे - सभापती म्हणून उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले "आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असूनत्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरीत्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडे नवीन शिकायला मिळते आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजनाकौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षणविभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.

*****



गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

 गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी

पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. : राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे  मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

   मंत्रालयात आज राज्यातील तलाव ठेक्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. राणे यांच्या उपस्थितीत बैठक  झाली. त्यावेळी ते बोलत होते.

तलावांच्या ठेके वाटपात शिस्त आणण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले कीग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या संस्थांचा आर्थिक विकास होण्यासाठी मत्स्य उत्पादन वाढ महत्वाची आहे. यासाठी निविदा पद्धतीने ठेके वाटप झाले पाहिजे. या सर्व व्यवसायावर एक नियंत्रण हवे. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात यावे. राज्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी मोठी संधी आहे. मासेमारी हा राज्यातील एक मोठा व्यवसाय आहे. यासाठी तलाव ठेक्यांची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीवर आणावी. या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध असावी. त्यामध्ये ठेका कोणत्या संस्थेला दिला. कधी दिला. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाव आहेत. याची सर्व माहिती असावीअशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

    मंत्री श्री. राणे म्हणाले कीराज्यात कोणकोणत्या संस्थांना कधी ठेके दिले आहेत. त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे काकधी केले आहे? नूतनीकरण नियमितपणे झाले आहे काया विषयी सविस्तर माहिती पुढील आठवड्यात सादर करावी. विभागाने मत्स्य व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय उद्योग विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राममत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 दरम्यान मंत्री श्री. राणे यांनी रेडी बंदर विषयी आढावा घेतला. रेडी बंदर रेल्वे आणि चारपदरी महामार्ग याने जोडले जाणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासास गती मिळणार असल्याचे मंत्री श्री राणे म्हणाले. तसेच या बंदर बाबत फेमेंतो कंपनीस येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सागरी महामंडळाने सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

            या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीपकॅप्टन प्रवीण खारासंजय उगुलमुगलेमहामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेफेमेंतो कंपनीचे कॅप्टन करकरे आणि उन्मेष चव्हाण उपस्थित होते.

००००

सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात




 सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोशी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

 

पुणेदि. ६ : तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. तसेच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारही वेगाने वाढताना दिसत आहेत. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला दिलासा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अखंड जपत वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देण्याचे काम पटवर्धन कुटुंब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोशी येथे धनश्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलआमदार महेश लांडगेअमित गोरखेअण्णा बनसोडेशंकर जगतापपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेमनपा आयुक्त शेखर सिंह,  रुग्णालयाचे संस्थापक डॉ. राजीव पटवर्धनरवींद्र भुसारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेअलीकडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा महागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 'युनिव्हर्सल हेल्थकेअरसिस्टीम लागू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्यच्या माध्यमातून मोठ्या रुग्णालयांमधून १ हजार ३०० सेवा मोफत देण्यात येतात. या माध्यमातून केंद्र शासनाच्या १ हजार ८०० सेवांचे पॅकेज राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धनश्री रुग्णालयानेही या सेवा दिल्यास गरजू रुग्णांना पैसे नसले तरी उपचार घेता येईल. शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही पॅकेजमध्ये न बसणाऱ्या आजारांसाठी अर्थसहाय्य देते. या सेवाही रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दोन्ही कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा या रुग्णालयामार्फत दिल्याने अत्याधुनिक सेवेचा लाभ गरजूंना मिळू शकेल असेही श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेसामाजिक बांधिलकीने पटवर्धन कुटुंब काम करत आहे. या रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. वेगवेगळ्या सर्जरी तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. रोबोटीक सर्जरीमुळे दुसऱ्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचत नाही. या सर्व आधुनिक सुविधा देण्याचे काम रुग्णालय करीत आहे ही बाब अनुकरणीय आहे.  

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणालेउत्तम आरोग्य सेवा सुदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करु शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज भासत आहे.  धनश्री हॉस्पिटलने ही गरज ओळखून १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरु केले आहे. शासनही नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देत आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. धनश्री रुग्णालयासारख्या खाजगी संस्थांमुळे या सेवांना आधार मिळतो व सरकारच्या आरोग्य सेवांना बळकटी येते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्राने या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे असे सांगून रुग्णालयात रुग्णाला उत्तम सुविधा मिळतीलअसा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

0000

Thursday, 6 February 2025

औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

 औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात

 

पुणेदि. ६ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असूनदेशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवारजलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतआमदार सुनील शेळकेलोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीनरिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो लीउद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासूमाजी आमदार बाळा भेगडेहॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेदावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुनत्यांच्या समस्या जाणून घेत आहोतराज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. ‘Ease of doing business’ या धोरणानुसार शासनाचे काम सुरू आहे.

आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचेअसे सांगत या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.

 

 

समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन म्हणालेलोट्टेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतोभारत आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ आहेआणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. हॅवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील प्रकल्पामध्ये १६ प्रॉडक्शन लाईन्स सुरू करणार आहोत.

रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली यांनीही मनोगत व्यक्त केले. हा आईस्क्रीम प्रकल्प एकूण साठ हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेला असूनया प्रकल्पात ५० दशलक्ष लिटर अशी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करुन तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या प्लँटमध्ये नऊ प्रोडक्शन लाईन कार्यरत आहेत. हॅवमोर प्रकल्प आपल्या विकासाला पुढील तीन वर्षात अधिक गती देईल. पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात हजार लोकांना रोजगार देईलज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.

कार्यक्रमाला स्थानिक कोरीअन असोसिएशन समुदाय सदस्यलोट्टे इंडियाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

*हा ट्रक ड्रायव्हर नक्कीच रामदास आठवले साहेबाचा पी. ए. असणार.😂😂😀😀🤔*

 *हा ट्रक ड्रायव्हर नक्कीच रामदास आठवले साहेबाचा पी. ए. असणार.😂😂😀😀🤔*


पार्ले कोकण महोत्सव

 


मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा

 मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

भव्य आणि मजबूत असावा

- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 6 : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये श्री. राणे बोलत होते.

 

         मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले कीपुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुतळ्याची सर्व कामे व्यवस्थित आणि मजबूत व्हावीत यासाठी दक्षता घ्यावी. पुतळ्याच्या रचनेचा विचार करुन त्याच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्याची विंड टनेल टेस्ट चांगल्या प्रकारे करण्यात यावी. पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या पुतळा उभारणीच्या कामामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणा, सल्लागार व ठेकेदार यांना समन्वयाबाबत सूचित करण्यात यावे.

 

            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगणकीय सादरीकरणाद्वारे पुतळ्याच्या कामाची माहिती देण्यात आली. या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. 60 फूट उंचीचा हा पुतळा संपूर्ण ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात येणार आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे. या पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून राजकोट येथील जागेवर पायाचे काम व चबुतऱ्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

            यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे यांनी देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. मत्स्य महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या तीन जागा देवगड येथे असून महाविद्यालयाच्या अधिकारी यांनी त्या जागांचे सर्वेक्षण करून त्याविषयी सविस्तर प्रस्ताव द्यावाहे मत्स्य महाविद्यालय, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीशी संलग्न असावेमहाविद्यालयाचे काम दर्जेदार करावेतसेच पालघर येथील महाविद्यालयाच्या कामाचाही पाठपुरावा करण्यात यावा अशा सूचना श्री. राणे यांनी यावेळी दिल्या.

0000

Featured post

Lakshvedhi