Thursday, 6 February 2025

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा

 मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

भव्य आणि मजबूत असावा

- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 6 : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये श्री. राणे बोलत होते.

 

         मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले कीपुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुतळ्याची सर्व कामे व्यवस्थित आणि मजबूत व्हावीत यासाठी दक्षता घ्यावी. पुतळ्याच्या रचनेचा विचार करुन त्याच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्याची विंड टनेल टेस्ट चांगल्या प्रकारे करण्यात यावी. पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या पुतळा उभारणीच्या कामामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणा, सल्लागार व ठेकेदार यांना समन्वयाबाबत सूचित करण्यात यावे.

 

            यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगणकीय सादरीकरणाद्वारे पुतळ्याच्या कामाची माहिती देण्यात आली. या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. 60 फूट उंचीचा हा पुतळा संपूर्ण ब्रॉन्झमध्ये तयार करण्यात येणार आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे. या पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून राजकोट येथील जागेवर पायाचे काम व चबुतऱ्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

            यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे यांनी देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. मत्स्य महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या तीन जागा देवगड येथे असून महाविद्यालयाच्या अधिकारी यांनी त्या जागांचे सर्वेक्षण करून त्याविषयी सविस्तर प्रस्ताव द्यावाहे मत्स्य महाविद्यालय, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीशी संलग्न असावेमहाविद्यालयाचे काम दर्जेदार करावेतसेच पालघर येथील महाविद्यालयाच्या कामाचाही पाठपुरावा करण्यात यावा अशा सूचना श्री. राणे यांनी यावेळी दिल्या.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi