Friday, 7 February 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव;

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम

अभिरुप स्वरुपात राजवर्धन कारंडे यांनी सांभाळले कौशल्य विकास मंत्री पद

 

मुंबईदि. 6 : युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी प्रथमच दिली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

 अभिरुप स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांचे आभार मानून नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभिरुप स्वरूपात सोपवण्यात आला.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीद्वारे प्रतिनिधी निवडले जातात आणि प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहितीत्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचाविभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे  मंत्रिमंडळ समृद्धी तुपे - मुख्यमंत्रीरिया खानोलकर - गृहमंत्री, पार्थ थोरवत, आर्यन दराडे - उपमुख्यमंत्रीपर्णवी धावरे - सभापती म्हणून उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले "आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असूनत्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरीत्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडे नवीन शिकायला मिळते आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजनाकौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षणविभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.

*****



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi