Thursday, 6 February 2025

स्त्री-पुरुष समानतेच्या पातळीवर

 स्त्री-पुरुष समानतेच्या पातळीवर 

आणून काम करावे - राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून अनेक महिलांनी स्वत:साठी रोजगार उपलब्ध केले. ही खरंच समाधानाची बाब आहे. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असताना स्त्री-पुरुष समानतेच्या पातळीवर आणून काम करणे आवश्यक आहेअसे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

            महिलांमध्ये सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी लहान पणापासूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शाळेत 'बालिका पंचायतसुरु करण्यात यावेजेणेकरुन या बालिका पंचायतीच्या माध्यमातून मुली आपले प्रश्न स्वत: सोडविणे त्यावर निर्णय घेणे याचे प्रशिक्षण या माध्यमातून मिळू शकणार आहे. असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमास स्त्री आधार केंद्राचे व  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

चौथे महिला धोरण महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 चौथे महिला धोरण महिलांच्या सर्वांगीण 

विकासाला चालना देणारे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी चौथे महिला धोरण जाहीर केले आहे. या धोरणात महिलांच्या आर्थिकसामाजिकशैक्षणिकआणि आरोग्यविषयक उन्नतीसाठी विविध उपायांचा समावेश आहे. या धोरणात अष्टसूत्री कार्यक्रमाचा समावेश आहेज्यामध्ये आरोग्यपोषणशिक्षणकौशल्य विकासमहिला सुरक्षालिंग समानतारोजगाराच्या संधीनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनआणि क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. या धोरणामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यास मदत होईलअसा विश्वास उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी  व्यक्त केला. तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थानी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या योजनांचे दूत व्हावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार

 पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित विकासासाठी निरंतर वाटचाल,

बीजिंग चौथे विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे : कृतीसत्र कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई, दि. 6 : राज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक प्रभावी योजना राबवित आहे. या योजनेसोबत मुलींचा जन्मदर कमी होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढीसाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणारअसे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित विकासासाठी निरंतर वाटचालबीजिंग चौथे विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे : कृतीसत्र या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकरआयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहाआमदार चित्रा वाघ, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळमहिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरेबाल हक्क सरंक्षणराष्ट्रीय महिला आंदोलन अभ्यासक डॉ.पाम रजपूत उपस्थित होते.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीमुलींचा जन्मदर वाढीसाठी शासनसोबत समाजाने देखील सहकार्य करावे. ग्रामीण भागात आजही सॅनिटरी पॅडबाबत हवी तशी जनजागृती झालेली दिसून येत नाहीयासाठी महिलांनी पुढाकार घेवून महिलांना सॅनिटरी पॅडचे महत्व पटवून द्यावे. तसेच महिलांचे आरोग्यविषयीचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहेअसे मंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.

चौथे महिला धोरण महिलांच्या सर्वांगीण 

विकासाला चालना देणारे-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी चौथे महिला धोरण जाहीर केले आहे. या धोरणात महिलांच्या आर्थिकसामाजिकशैक्षणिकआणि आरोग्यविषयक उन्नतीसाठी विविध उपायांचा समावेश आहे. या धोरणात अष्टसूत्री कार्यक्रमाचा समावेश आहेज्यामध्ये आरोग्यपोषणशिक्षणकौशल्य विकासमहिला सुरक्षालिंग समानतारोजगाराच्या संधीनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनआणि क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. या धोरणामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यास मदत होईलअसा विश्वास उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी  व्यक्त केला. तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थानी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या योजनांचे दूत व्हावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव

 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे

31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

   मुंबईदि. 6 :  पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2027 मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणाकडून सूक्ष्म नियोजन असणे गरजेचे आहे,या कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ग्लॅम्पिंग महोत्सव आहे.यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

             पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले कीनाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हा महोत्सव प्रायोगिक तत्वावरील कुंभमेळ्याची तयारी आहे.आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर रीलिजिअस हब’ म्हणून विकसित व्हावे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहेया दृष्टीने तीर्थक्षेत्र पर्यटनाद्वारे नाशिक आधुनिक शहर व्हावे यासाठी पर्यटन संचालनालयाकडून अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार आहे.

                  या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलांचा अनुभव आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच विविध कार्यशाळांमधून राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी मिळणार आहे. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरच्या आवारात विविध साहसी उपक्रमांचा अनुभव घेता येईल,अगदी शेती करण्यापासून ते चुलीवरच्या जेवणाचाही आस्वाद घेता येईल तसेच नाशिकची खासियत असलेल्या वाईनच्या उत्पादनाचा प्रवासही  उलगडण्यात येणार आहे. पर्यटकांना या महोत्सवात एकाच वेळी आरामदायीआलिशान निवास व्यवस्थेसह निसर्गरम्य दृश्यखळाळणारे पाणी आणि सुर्योदयाचाही आनंद लुटता येईल. या महोत्सवात आरामदायी पर्यटनासह शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्लॅम्पिंग महोत्सवाची वैशिष्ट्ये

              पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास व्यवस्थेची उभारणीस्थानिक संस्कृतीचे दर्शनपॅराग्लायडींगपॅरामोटरींगजलक्रिडाट्रेकींगरॉक क्लायबिंगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थानिक बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री दालन असून स्थानिक खाद्यसंस्कृती व खाद्य महोत्सव दालनही आहे. नाशिक येथील परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळेपुरातन मंदिरांचे दर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रेकिंगरॉक क्लाइंबिंगरिव्हर राफ्टींग यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. भागधारकट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधीटूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणेपर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकव्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमही  आयोजित करण्यात आले आहेत.

नाशिकजवळील पर्यटन स्थळे

          गोदावरी नदीला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हणतात. याखेरीसनाशिकमध्ये तोफखाना केंद्रनाणे संग्रहालयगारगोटी खनिज संग्रहालयदादासाहेब फाळके संग्रहालयदुधसागर धबधबापंचवटीसर्व धर्म मंदिर तपोवनमांगी तुंगी मंदिरसप्तश्रृंगी गडत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरपांडव लेणीसोमेश्वर मंदिररामकुंडधम्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत.

****

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी 34 लाख 90 हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर

592 कोटी 34 लाख 90 हजाराची मदत डीबीटीद्वारे वर्ग

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

मुंबईदि. 6 :- अतिवृष्टीपूरअवेळी पाऊसदुष्काळवादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे  बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहेअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये  अतिवृष्टी/पूर सन 2022सन 2023सन 2024अवेळी पाऊस 2022-2023व 2023-2024अवेळी पाऊस/अतिवृष्टी 2023-2024दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेलअसा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितलेया मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये 4 हजार 671 लाभार्थ्यांना 7 कोटी 40 लाख 29 हजार 820 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे.  यात अकोला जिल्ह्यातील 363 लाभार्थ्यांना  51 लाख 96 हजार 942  रुपयेअमरावती जिल्ह्यातील  1 हजार 630 लाभार्थ्यांना  3 कोटी 61 लाख 81 हजार 886 रुपयेबुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींना 1 कोटी 2 लाख 54 हजार 387 रुपयेवाशिम जिल्ह्यातील 401 लाभार्थींना 49 लाख 19 हजार 488 रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 603 लाभार्थींना 1 कोटी 74 लाख 77 हजार 118 रुपयांची मदत वर्ग केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4 लाख 83 हजार 883 लाभार्थींना 514 कोटी 85 लाख 23 हजार 260 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात बीड जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 910 लाभार्थींना 106 कोटी 12 लाख 77 हजार 422 रुपयेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 हजार 463 लाभार्थींना 2 कोटी 42 लाख 73 हजार 471 रुपये,  धाराशिव जिल्ह्यातील 27 हजार 307 लाभर्थ्यांना 36 कोटी 24 लाख  7 हजार 748 रुपये,  हिंगोली जिल्ह्यातील 56 हजार 81 लाभार्थीना 69 कोटी 71 लाख  979 रुपये,  जालना जिल्ह्यातील 8 हजार 245लाभार्थींना 10 कोटी 74 लाख 76 हजार 397 रुपयेलातूर जिल्ह्यातील 23 हजार 841 लाभार्थींना 21 कोटी 34 लाख 43 हजार 75 रुपयेनांदेड जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 242 लाभार्थींना 250 कोटी 28 लाख  1 हजार 952 रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 15 हजार 794 लाभार्थींना 17 कोटी 97 लाख 42 हजार 217 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21 लाख 81 हजार 781 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये  रायगड जिल्ह्यातील  16 लाभार्थ्यांना  1 लाख 10 हजार 487 रुपये,  रत्नागिरी जिल्ह्यातील 3 लाभार्थ्यांना  8 हजार 600 रुपयेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील  703 लाभार्थ्यांना 12 लाख 88 हजार 634 रुपयेठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस 9 हजार रुपये,  पालघर जिल्ह्यातील 142 लाभार्थीना 7 लाख 65 हजार 60 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नागपूर विभागात 20 हजार 898  लाभार्थींना  26 कोटी 43 लाख 10 हजार 864 रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये  भंडारा जिल्ह्यातील  176 लाभार्थीना 22 लाख            56 हजार 210 रुपयेचंद्रपूर जिल्ह्यातील 5 हजार 288 लाभार्थीना 4 कोटी 86 लाख 74 हजार 753 रुपयेगडचिरोली जिल्ह्यातील  6 हजार 752 लाभार्थ्यांना 8 कोटी 11 लाख 94 हजार 213 रुपयेगोंदिया जिल्ह्यातील 3 हजार 146 लाभार्थींना 4 कोटी 12 लाख 47 हजार 223 रुपयेनागपूर जिल्ह्यातील 3 हजार 874 लाभार्थींना 7 कोटी 40 लाख 30 हजार 676 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 662 लाभार्थ्यांच्या  बँक खात्यावर  1 कोटी 69 लाख 7 हजार 790 रुपये  डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.

नाशिक विभागात 1 हजार 909 लाभार्थ्यांना 2 कोटी 71 लाख 91 हजार 791 रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये  अहिल्यानगर जिल्ह्यात 228 लाभार्थींना 29 लाख 66 हजार 546 रुपयेधुळे जिल्ह्यातील 115 लाभार्थीना 13 लाख 61 हजार 437 रुपयेजळगाव जिल्ह्यातील 1 हजार 26 लाभार्थींना 1 कोटी 87 लाख 29 हजार 795 रुपयेनंदूरबार जिल्ह्यातील 8 लाभार्थींना 1 लाख 22 हजार 315 रुपये तर नाशिक जिल्ह्यातील 532 लाभार्थींना 40 लाख 11 हजार 699 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात अली आहे.

पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या  बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात  कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना  99 लाख     62 हजार 37 रुपयेपुणे जिल्ह्यातील  3 हजार 383 लाभार्थ्यांना 2 कोटी 32 लाख 45 हजार 952 रुपयेसांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार 145 लाभर्थ्यांना 35 कोटी 63 लाख 745 रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.

0000

आयुष्य फार सुंदर आहे

 आयुष्य फार सुंदर  आहे 

खिशातून *५०* ची एक नोट जरी पडली तर *कावरा बावरा* अन् *बेचैन* होणारा *'माणूस'* आयुष्याची *५० वर्षे* उलटली तरी *परिवर्तन* येत नाही, *बिन्धास्तच* वागतो ! काय *दुर्दैव* आहे !!


 *स्मशानभूमीची* सुरक्षा तपासणी किती *कडक* आणि *मजबूत* असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, *पैसा* तर फार दूरची गोष्ट आहे, इथे *श्वासही* सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कीतीही *मोठे* किंवा तुमची *थेट वर पर्यंत ओळख* असली तरी!


 *काळाचा कावळा* *आयुष्याच्या माठावर* बसतो अन् *रात्रंदिवस* *वय पीतो!*

 *'माणूस समजतो: मी जगतोय!!* 


माणूस खाली बसून *पैसे* आणि *संपत्ती* मोजतो: *काल* किती होते आणि *आज* ते किती *वाढले* आहेत आणि *वरती* तो हसणारा *माणसाचे श्वास* मोजतो : *काल* किती *होते* आणि *आज* किती *उरले* आहेत !!


तर चला, *"उरलेले"* आयुष्य *"अवशेष"* बनण्यापूर्वी त्याला *"विशेष"* बनवूया!


 *"पासबुक"* आणि *"श्वास बुक"* , दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. *पासबुकात* *"रक्कम"* आणि *श्वास* बुकात *"सत्कर्म"* 


म्हणून


*`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.'* 

 *“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?”*


*जीवनाचे सार* 


*जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.*

*रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.*

*रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,*

*ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.* 

*बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.*

*ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.* 

*मित्रांनो जीवन सुंदर आहेच,फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे.*


*_वाचण्यात आलेला सुंदर लेख_*🌹🌹

Nalsa -national free legal service


 

Featured post

Lakshvedhi