Thursday, 6 February 2025

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव

 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे

31 मार्च पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सव

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

   मुंबईदि. 6 :  पर्यटन विभागाकडून पहिल्यांदाच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2027 मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा धार्मिक सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणाकडून सूक्ष्म नियोजन असणे गरजेचे आहे,या कुंभमेळ्याच्या आयोजनच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ग्लॅम्पिंग महोत्सव आहे.यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

             पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले कीनाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हा महोत्सव प्रायोगिक तत्वावरील कुंभमेळ्याची तयारी आहे.आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर रीलिजिअस हब’ म्हणून विकसित व्हावे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहेया दृष्टीने तीर्थक्षेत्र पर्यटनाद्वारे नाशिक आधुनिक शहर व्हावे यासाठी पर्यटन संचालनालयाकडून अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार आहे.

                  या महोत्सवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलांचा अनुभव आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच विविध कार्यशाळांमधून राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्याची संधी मिळणार आहे. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरच्या आवारात विविध साहसी उपक्रमांचा अनुभव घेता येईल,अगदी शेती करण्यापासून ते चुलीवरच्या जेवणाचाही आस्वाद घेता येईल तसेच नाशिकची खासियत असलेल्या वाईनच्या उत्पादनाचा प्रवासही  उलगडण्यात येणार आहे. पर्यटकांना या महोत्सवात एकाच वेळी आरामदायीआलिशान निवास व्यवस्थेसह निसर्गरम्य दृश्यखळाळणारे पाणी आणि सुर्योदयाचाही आनंद लुटता येईल. या महोत्सवात आरामदायी पर्यटनासह शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्लॅम्पिंग महोत्सवाची वैशिष्ट्ये

              पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास व्यवस्थेची उभारणीस्थानिक संस्कृतीचे दर्शनपॅराग्लायडींगपॅरामोटरींगजलक्रिडाट्रेकींगरॉक क्लायबिंगघोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थानिक बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री दालन असून स्थानिक खाद्यसंस्कृती व खाद्य महोत्सव दालनही आहे. नाशिक येथील परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळेपुरातन मंदिरांचे दर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रेकिंगरॉक क्लाइंबिंगरिव्हर राफ्टींग यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. भागधारकट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधीटूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणेपर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारकव्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमही  आयोजित करण्यात आले आहेत.

नाशिकजवळील पर्यटन स्थळे

          गोदावरी नदीला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हणतात. याखेरीसनाशिकमध्ये तोफखाना केंद्रनाणे संग्रहालयगारगोटी खनिज संग्रहालयदादासाहेब फाळके संग्रहालयदुधसागर धबधबापंचवटीसर्व धर्म मंदिर तपोवनमांगी तुंगी मंदिरसप्तश्रृंगी गडत्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरपांडव लेणीसोमेश्वर मंदिररामकुंडधम्मगिरी आणि कुशावर्त तीर्थ अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi