आयुष्य फार सुंदर आहे
खिशातून *५०* ची एक नोट जरी पडली तर *कावरा बावरा* अन् *बेचैन* होणारा *'माणूस'* आयुष्याची *५० वर्षे* उलटली तरी *परिवर्तन* येत नाही, *बिन्धास्तच* वागतो ! काय *दुर्दैव* आहे !!
*स्मशानभूमीची* सुरक्षा तपासणी किती *कडक* आणि *मजबूत* असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, *पैसा* तर फार दूरची गोष्ट आहे, इथे *श्वासही* सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कीतीही *मोठे* किंवा तुमची *थेट वर पर्यंत ओळख* असली तरी!
*काळाचा कावळा* *आयुष्याच्या माठावर* बसतो अन् *रात्रंदिवस* *वय पीतो!*
*'माणूस समजतो: मी जगतोय!!*
माणूस खाली बसून *पैसे* आणि *संपत्ती* मोजतो: *काल* किती होते आणि *आज* ते किती *वाढले* आहेत आणि *वरती* तो हसणारा *माणसाचे श्वास* मोजतो : *काल* किती *होते* आणि *आज* किती *उरले* आहेत !!
तर चला, *"उरलेले"* आयुष्य *"अवशेष"* बनण्यापूर्वी त्याला *"विशेष"* बनवूया!
*"पासबुक"* आणि *"श्वास बुक"* , दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. *पासबुकात* *"रक्कम"* आणि *श्वास* बुकात *"सत्कर्म"*
म्हणून
*`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.'*
*“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?”*
*जीवनाचे सार*
*जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.*
*रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.*
*रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,*
*ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.*
*बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.*
*ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.*
*मित्रांनो जीवन सुंदर आहेच,फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे.*
*_वाचण्यात आलेला सुंदर लेख_*🌹🌹
No comments:
Post a Comment