Wednesday, 22 January 2025

पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

 पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, दि. २१ : पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी  कोणकोणत्या बाबी करता येवू शकतील हे विचारात घेवून नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

             मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशीमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           पर्यटनमंत्री श्री.देसाई म्हणाले कीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चालवत असलेले पर्यटक निवासविकसित करत असलेले पर्यटक निवास, दीर्घ व अल्प मुदतीवर चालवण्यासाठी दिलेल्या मालमत्ता यांची योग्य ती निगा राखणे आपली जबाबदारी आहे. सर्व मालमत्तांची तपासणी करून त्या सुव्यवस्थितपणे वापरल्या जातील याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिराच्या ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवासी व्यवस्थेची दुरूस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी पर्यटन वाढू शकते अशा ठिकाणांवर पर्यटन विकासाची कामे करण्याचे प्रस्तावित करावेत, असेही पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत

 सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत

निर्णय लवकरच

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २१ : -   सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे.निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन)  याबाबत नवीन धोरण  तयार करून  या बाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाईलअशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

 

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणेनिर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजागांधी चौकता.वणीजि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि  जरीपटका कॉलनीनागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात  महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारउपसचिव  श्रीमती  अश्विनी यमगर  व संबधित अधिकारी उपस्थित होते.

शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमीनबाबत निर्णय लवकरच

 सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमीनबाबत

निर्णय लवकरच

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २१ : - सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सांगितले.

सांगली शहरात एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार  सुधीर गाडगीळमहसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकमसत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते. सांगली  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  खासगी व्यक्तीचे क्षेत्राचा धारणाधिकार  एल बदलून त्याचे रूपांतर ए  मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे.  या निर्णयास मंत्री मंडळाची मान्यता घेणे उचित  ठरणार असल्याने त्यामुळे याबाबत लवकरच मंत्री मंडळात निर्णय घेतला जाईल.

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी

 स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम  राबविण्यात यावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आर्थिक वर्ष 2025 - 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंगआरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायकसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरवैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगेराज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणसहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणालेनाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 - 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी.  यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी.  या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावीअशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

००००

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार

 अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

गर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. 21 : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येवून माहिती देतातअशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.   

राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने अशा प्रकरणावर कारवाया वाढविण्यात याव्यातअशा सूचनाही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य भवन येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस सचिव विरेंद्र सिंगआयुक्त अमगोथू श्री रंगा नायकसंचालक डॉ नितीन अंबाडेकरसहसंचालक श्रीमती कमलापुरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीमहानगर पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यात स्त्री - पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अवैध गर्भपात रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा सिद्ध करून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकरणात गुन्हे सिद्धता वाढविण्यात येईल. आंतरराज्य जिल्ह्यामध्ये शेजारच्या राज्यातील जिल्ह्यातील प्रशासनाशी समन्वय साधून दोषींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात यावीअसे निर्देशही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेअवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस  जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होवू नयेयासाठी काळजी घेण्यात यावी. ऑनलाईन विक्री होत असल्यास याबाबत पडताळणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. जिल्हा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्तेचळवळीतील नागरिकांचा सहभाग करण्यात यावा. या समित्या आणखी सक्षम करण्यात यावी. खबरी बक्षीस योजनेतील बक्षीस वाढविण्याबाबत कार्यवाही करावी.

०००

Tuesday, 21 January 2025

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ

 गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म,

वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली

 

 

मुंबईदि. 21 :- 'अध्यात्मवैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकारसंत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संतांची साहित्यसंपदा जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान-शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथांची निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी भावी पीढीसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकासतत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवारतसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळोअशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतोअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

000


शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

 शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

 

मुंबईदि. 21 : वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर "जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट"चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड - पाटीलप्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते. 

 आयुक्त श्री. निवतकर म्हणाले, रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य तसेच मौखिक आरोग्यामध्ये कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिवस साजरा केला जातो.

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धाक्रॉसवर्ड कोडेसर्जनशीलता, स्लोगन स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दंत चिकित्सामध्ये कृत्रिम दंतशास्त्रांचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण जागरूकतेसाठी कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध उपचारांबद्दल माहितीपत्रकांचे प्रकाशन करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.


Featured post

Lakshvedhi