जनतेसाठी लढताना आपल्या आयुष्याचे बलिदान देणारे स्वर्गीय पुंडलिक राऊत यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे आयोजित कार्यक्रमात पुंडलिक राऊत ह्यांच्या स्मृतीला उजाळा देत महविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 18 August 2024
जनतेसाठी लढताना आपल्या आयुष्याचे बलिदान देणारे स्वर्गीय पुंडलिक राऊत यांच्या पुण्यतिथी निमित्त
19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनानिमित्त....
फोटोग्राफी क्षेत्रातील प्रवासावरील लेख.....
छायाचित्र म्हणजे फोटो ही केवळ एक निर्जीव वस्तू नसते, तर ती असते त्या व्यक्तीच्या जीवनातील एक अमूल्य आठवण, छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली.
आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहताना आठवणींचा खजिनाच आपण उघडत असतो. हा खजिना ज्याच्यामुळे जतन करता आला, त्या छायाचित्रकारास मात्र आपण विसरून जातो. या छायाचित्रकारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि छायाचित्रणास उतेजन देण्यासाठी जगभरात 19 ऑगस्ट हा "जागतिक छायाचित्रण दिन" म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आपल्या परळीतील एका अनोख्या छायाचित्रकाराचा परिचय करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. फोटोग्राफी हा पुरुषांची मक्तेदारी असलेला प्रांत. या पुरुषांच्या दुनियेत नवीन कल्पना सोबत घेऊन अत्यंत दमदारपणे आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी आणि मरगळलेल्या फोटोग्राफी क्षेत्राला नवीन "संजीवनी" देणारी एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणजे सौ संजीवनी राम भाले "बेबी मॅजिक" या आपल्या नवजात बाळांच्या फोटोसाठीच वाहिलेल्या फोटो स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या फोटोग्राफर पतीला समर्थ साथ देत असलेली एक अतिशय चांगली छायाचित्रकार. मोबाईल कॅमेरा मधील क्रांती नंतर ग्राहकांनी फोटो काढण्यासाठी स्टुडिओत जाणे जवळजवळ सोडून दिले आहे. प्रत्येक जण आपले फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात स्वतःच क्लिक करून हे फोटो सोशल मीडिया द्वारे सार्वजनिक करण्यात आणि आपली कलाकारी दाखवण्यात व्यस्त आहे. हे फोटो जतन करण्यासाठी गुगलने गुगल फोटो फुकटात उपलब्ध करून दिले आहे,त्यामुळे फोटो काढणे हा पूर्वी जसा सोहळा असायचा, तसा तो आता राहिलेला नाही. आपल्या दररोजच्या आठवणी आपण अत्यंत सहजपणे मोबाईल कॅमेऱ्याने टिपून त्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात जतन करून ठेवू शकतो. फोटोग्राफी क्षेत्राला या नवीन बदलांमुळे मरगळ आल्यासारखी वाटत होती. परळीतील उत्कृष्ट फोटोग्राफर असा नावलौकिक असलेले श्रीराम भाले आपल्या भाले फोटोग्राफी या स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना फोटोग्राफीची सेवा देत असताना, त्यांची पत्नी आपल्या आदिती आणि व्यंकटेश या चिमुकल्यांना सांभाळत आपले आदर्श गृहिणीचे कार्य पार पाडत होती; याचवेळी फोटोग्राफीची आपल्या मनातील आवड ओळखून आणि या क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्या पतीशी चर्चा करून फक्त नवजात बालक आणि चिमुकल्यांच्या भावविभोर करणाऱ्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी "बेबी मॅजिक" या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून परळीकरांना सेवा देण्यास सज्ज झाली, आणि आज या क्षेत्रात स्वतःचे एक स्वतंत्र स्थान या आदर्श गृहिणीने निर्माण केले आहे, ही परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खरे म्हणजे महिलांना स्वतः नटून थटून, स्वतःचेच फोटो काढण्याची हौस असते, त्यासाठी त्या पाहिजे तेवढा वेळ द्यायला तयार असतात. स्वभावतःच सर्व स्त्रियांमध्ये एक कलाकार दडलेला असतो. रंगसंगती बद्दलचे त्यांचे ज्ञान तर प्रत्येक पुरुष मान्य करतो. आपले हे उपजत गुण ओळखून आणि प्रकाश योजना, बॅकग्राऊंड, फोटोचा ठराविक अँगल या फोटोग्राफी मधील बारकाव्यांचा अभ्यास करून स्वतःचे फोटो न काढता इतर स्त्रियांना आणि बालकांना सजवून त्यांचे अप्रतिम फोटो काढण्याचे कसब संजीवनी भाले यांनी प्राप्त केले आहे. लहान बालकांचे मुड्स सांभाळून, त्यांची योग्य वेशभूषा करून अगदी सहजपणे त्यांचे आईच्या नजरेतून विविध क्षणांचे फोटो त्या टिपतात. यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते केवळ एक महिना वयाच्या बाळाचेच फोटोशूट त्या करतात. आपल्या या स्वतंत्र स्टुडिओच्या माध्यमातून नवजात बाळांच्या पालकांसाठी, आपल्या बाळाचे लहानपण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा हा "बेबी मॅजिक स्टुडिओ"चा प्रयत्न वरदानच ठरला आहे, यात शंका नाही.
मोठ्या शहरातील आधुनिक स्टुडिओच्या धर्तीवर केवळ लहान बालकांच्या फोटोसाठीचा हा स्वतंत्र स्टुडिओ परळी सारख्या लहान गावात काढणे हे धाडसाचेच काम आहे. पण सौ संजीवनी भाले यांनी ते आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर शक्य करून दाखवले आहे.
यासोबतच मॅटर्निटी फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, मॉडेलिंग फोटोज इत्यादी क्षेत्रात पण त्या सध्या आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने परळीतील या महिला छायाचित्रकारास फोटोग्राफीच्या पुढील प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
- शब्दांकन...
गोपाळ रावसाहेब आंधळे
माजी शिक्षण सभापती
परळी वैद्यनाथ
मो.9823335439
Saturday, 17 August 2024
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा
- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई, दि. १६ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि.३१.०८.२०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णय मध्ये या स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आहे सन २०२४ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलो आहे.ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील. ३. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्होडोओसह राज्य समितीकडे देण्यासाठो जिल्हाधिकारी मार्फत प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील.निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा यावावत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांचेकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतोल.
00000
महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे
शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. 16 : राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक झाली. बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दोन दिवसांपासून राज्यातील महिला भगिनींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होत आहे. काल मी यातील काही भगिनींनीशी संवाद साधला. त्यांना मिळणारी रक्कम छोट्या व्यवसायासाठी उपयोगात आणणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजले. त्यामुळे आता महिला भगिनी करीत असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
राज्यात सुमारे ७ लाख ८२ हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे बचत गट कार्यरत आहेत. महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मोकळ्या जागा, मैदाने याठिकाणी काही दिवसांकरीता स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी. जेणेकरून याठिकाणी हक्काची बाजारपेठ या गटांना मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बचत गटांच्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्याची दखल घेऊन राष्ट्रीयस्तरावर देखील त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद, एनयुएलएम, माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी धर्मवीर आनंद दिघे महारोजगार ॲपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटीत कामगारांचे डिजीटल जॉबकार्ड तयार करण्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली.
बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते.
होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी ची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार
होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी ची माहिती
संकेतस्थळावर उपलब्ध होणार
मुबंई, दि. 16 : होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.
होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तसेच मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.
नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, तर ‘'मर्मर्स ऑफ द जंगल' ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा विविध श्रेणींमध्ये एकूण 56 पुरस्कार महाराष्ट्राला पाच पुरस्कार
मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट,
तर ‘'मर्मर्स ऑफ द जंगल' ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
विविध श्रेणींमध्ये एकूण 56 पुरस्कार
महाराष्ट्राला पाच पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 16 : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो” या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, 'वारसा’(लेगसी)' या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्यूरीमध्ये फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष निला मधब पांडा, आणि बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा ज्यूरीचे अध्यक्ष गंगाधर मुढालैर हे उपस्थित होते.
फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.
‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
फिचर फिल्म श्रेणीत वर्ष 2022 साठी मराठी भाषेमधून ‘वाळवी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वाळवी हा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला आहे . तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या लघुपटाला जाहीर झाला आहे. "मर्मर्स ऑफ द जंगल" हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.
या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.
“आणखी एक मोहेन्जो दडो” यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक
ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जो दडो" या चित्रपटाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे उद्दिष्ट म्हणजे प्राचीन मोहेन्जो दडो संस्कृतीच्या गूढतेला आणि इतिहासातील या महान संस्कृतीच्या पुनर्निर्माणाला उजाळा देण्याचा महत्व देणारा चित्रपट आहे.
चित्रपटात मोहेन्जो दडोच्या उत्खननांमध्ये आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून त्या काळातील समाजजीवन, संस्कृती, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संशोधनाच्या आधारे मोहेन्जो दडोची समृद्ध परंपरा, त्यातील रहस्य आणि हडप्पा संस्कृतीचा विकास कसा झाला याचे बारकाईने चित्रण केले आहे.
या चित्रपटाने इतिहासातील प्राचीन सभ्यतेच्या महत्वाच्या पैलूंना प्रकाशात आणले असून प्रेक्षकांना त्या काळाच्या जीवनशैलीची सजीव अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचे चित्रण, निर्देशन आणि ऐतिहासिक सत्यता यामुळेच याला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार 'वारसा (लेगसी)'
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी) या माहितीपटाला जाहीर झाला. यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपत असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.
सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहिर
नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा 'मर्मर्स ऑफ द जंगल'या माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोबतच सर्वोत्तम बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना 'ऊंचाई' चित्रपटासाठी, केजीएफ 1: चॅप्टर 2' सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, 'काबेरी अंतरधान' सर्वोत्तम बंगाली चित्रपट, 'ब्रह्मास्त्र' या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, 'फौजा' साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, 'अपराजितो' ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, 'कांतारा'साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, 'थिरुचित्राम्बलम'साठी नित्या मेनन तर 'कच्छ एक्सप्रेस'साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहे.
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...

