Saturday, 17 August 2024

होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी ची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार

                                

होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी ची माहिती

संकेतस्थळावर उपलब्ध होणार

 

            मुबंईदि. 16 : होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

            होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही  तांत्रिक  अडचणीमुळे  उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी तसेच  मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

            नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावीअसे आवाहन समादेशकहोमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्तसशस्त्र पोलीस ताडदेवमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi