Monday, 29 April 2024

Silent killers

 इंग्रजी व्यतिरिक्त मराठीतही कांही शब्द 'Silent' असतात. 


उदाहरणच द्यायचं म्हटलं म्हणजे जसं की... , 


जेव्हा एखादा दुकानदार भाव करतेवेळी म्हणतो की "तुम्हाला जास्त नाही लावणार" तेव्हा यात


"चूना" हा शब्द Silent असतो.. 😂😃😅


लग्नाच्या वेळी असं म्हटल्या जातं की आमची मुलगी तर "गाय आहे गाय"


तेव्हा यात " शींगवाली" शब्द silent असतो 😂😂😜


वधूची पाठवणी करताना जेव्हा जावयाला डोळ्यांत पाणी आणून सांगितल्या जातं 

"काळजी घ्या",


तेव्हा यात "आपली" हा शब्द Silent असतो.

🤣🤣


जेव्हा एखादा नेता म्हणतो, "गरीबी हटवीन"

तेव्हा

"माझी"

हा शब्द silent असतो.

👌👌👌👌.

स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा...!😊

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

                                                                                   

            मुंबईदि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

            अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ताविशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 

            आज झालेल्या रंगीत तालीम मध्ये राज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बलबृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलमहाराष्ट्र पोलीस ध्वजमुंबई पोलीस ध्वजराज्य राखीव पोलीस बल ध्वजमहाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वजमुंबई अग्निशमन दल ध्वजबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलबृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळबृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथकराज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथकबृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथकमुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहनहायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

 

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

 

            भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना रंगीत तालीम दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथमराज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले)डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलदादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली)एमसीएम मुलींचे हायस्कूलकाळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथमग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला. 

 

            या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

 

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ/

विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!* 😊😊

 *विवाहाची आमंत्रणपत्रिका देऊन अपमान करण्याची पद्धत म्हणजे लग्नातले स्वागत व सत्कार समारंभ!*

😊😊


लग्नकार्यात आलेल्या काही मोजक्या श्रीमंत पैसेवाले व मोठ्या लोकांचे स्टेजवरून नाव घेऊन स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच आलेल्या इतर सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराचा अप्रत्यक्षपणे अपमान समजावा का!

 ते म्हणजे वेळात वेळ काढुन आले आणि बाकीचे येणारे काही रिकामटेकडे आहेत का?

*अशा फालतू प्रथा बंद करायला पाहिजेत, असे सुचवावेसे वाटते.*


प्रतिष्ठित असोत की पुढारी, कुणाचेही शब्दसुमनानी स्वागत करणे हेही बंद केलं पाहिजे. प्रतिष्ठित मान्यवरांचे नाव घेऊन स्वागत करायचे म्हणजे लग्नाला पैसे खर्चून येणारे बाकीचे हॉलमधील सगळे समाजबांधव अप्रतिष्ठीत असतात का? नाही. निमंत्रणाचा स्वीकार करून वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्वच समाज बांधव आणि भगिनी, आप्तेष्ट तसेच मित्रपरिवार देखील आलेले असतात, जे विवाह सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहून सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवितात. तेव्हा प्रारंभीच उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींचे शाब्दिक स्वागत करून पुढील विवाह विधी नियोजित वेळेवर पार पाडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते.


🙏🙏

सी-व्हिजिल ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा

 सी-व्हिजिल ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा


                                           - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर


            सी - व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच , आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार प्ररकरणी जवळपास 93 लाखांची रक्कम जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, बँकेचे समन्वय अधिकारी, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारी, भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी, एक खिडकी कक्षाचे समन्वय अधिकारी अमोल शिंदे यांच्यासह सर्व पथकाचे समन्वय अधिकारी उपस्थित 

होते.


Sunday, 28 April 2024

उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी - केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

 उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

                                           - केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

 

         मुंबईदि. 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावीअसे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव  यांनी दिले.  

            मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोज शहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात नुकतीच खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

            या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकरनिवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी सीताराम काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 157-भांडुप पश्चिम, 169 - घाटकोपर पश्चिम , 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

            निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत निरीक्षक डॉ. यादव म्हणाले की,  मुंबई उत्तर पूर्व अंतर्गत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या खर्चाच्या बँक खात्यावर देखरेख ठेवणेसंवेदनशील क्षेत्रात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेतही भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने सतर्क रहावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत  नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

           कक्षतक्रार कक्षआचारसंहिता कक्षपोलीस कक्ष सर्वांनी एकत्रितरित्या काम करूननि:पक्ष पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.  

            आचार संहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे

तज्ज्ञांची व्याख्याने, गप्पा-गोष्टी, प्रदर्शन आणि बरंच काही…

 तज्ज्ञांची व्याख्याने, गप्पा-गोष्टी, प्रदर्शन आणि बरंच काही…

• “भवताल गेट-टुगेदर” १८ मे; नाव नोंदवले का?

“भवताल” शी संबंधित सर्वांनी एकत्र यावं, गप्पागोष्टी कराव्या, भवताल मासिक - कोर्सेस - इकोटूर्स - कट्टा - भिजूया मोजूया या उपक्रमांच्या निमित्ताने भेटलेल्या सर्वांशी संवाद साधावा, आठवणींना उजाळा द्यावा, एखाद्या विषयावर व्यक्त व्हावं, तज्ज्ञांकडून नवं काहीतरी ऐकावं, ज्ञानग्रहण करावं… असं “भवताल” चं गेट-टुगेदर!

दिवस आहे- शनिवार, १८ मे २०२४. ठिकाण- पुण्यात कोथरूड परिसर. सकाळी ९ ते सायं. ५ असा दिवसभराचा कार्यक्रम आहे. आमंत्रण सर्वांना आहे- “भवताल” च्या विविध उपक्रमांमध्ये‌ सहभागी झालेले किंवा सहभागी होऊ इच्छिणारे. अट एकच. पुढे दिलेल्या लिंकवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादित असल्याने नावनोंदणी आवश्यक!

मग वाट कशाची पाहताय? नावनोंदणी करा आणि आपला सहभाग निश्चित करा.

तज्ज्ञ व्याख्याते:

• डॉ. कुरुष दलाल
(आर्कियॉलॉजी ऑफ फूड)

• डॉ. हिमांशू कुलकर्णी
(भूजलाच्या नव्या वाटा)

इतरही सादरीकरणे.

नाव नोंदणीसाठी लिंक:
https://forms.gle/mWqqvMWDpYAFS6Aq6

संपर्क:
bhavatal@gmail.com

• भवताल टीम

(भवताल गेट-टुगेदर)

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती

  

29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी

सूरज कुमार गुप्ता यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्चम्हणून नियुक्ती

 

मुंबई दि. 28 – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुरजकुमार गुप्ता (आयआरएसयांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे.

            केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्चश्रीगुप्ता यांचे  कार्यालय हे  29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतशासकीय वसाहतवांद्रे पूर्वमुंबई 400051 येथे असून त्यांचा संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक                        +91 8591369100 असा आहे.

            आज निवडणूक निरीक्षक (खर्चश्रीगुप्ता यांनी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपोलीस उपायुक्तसहायक निवडणूक निर्णय अधिकारीवॉर्ड ऑफीसरराज्य उत्पादन शुल्क यासह मतदारसंघासाठी

Featured post

Lakshvedhi