Sunday, 21 April 2024

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी...

 अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी...

            मुंबईदि. २० : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

            राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे रोजी  धुळेदिंडोरीनाशिकपालघरभिवंडीकल्याणठाणेमुंबई उत्तरमुंबई उत्तर-पश्चिममुंबई उत्तर-पूर्वमुंबई उत्तर- मध्यमुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे.

            त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासूनजर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Ø  मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नावआडनाववडील किंवा पतीचं नाववयलिंगराज्यजिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Ø  मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा

अर्ज क्र. ६ - नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्रतसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलासाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड राष्ट्रीयश्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणीवीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ कसा भरावामतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांचे दुवे :

फेसबूक: https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra

युट्यूब: https://www.youtube.com/@ceomaharashtra211

इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/ceo_maharashtra/

एक्स (ट्विटर): https://twitter.com/CEO_Maharashtra

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

Saturday, 20 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत

 ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

 

             मुंबईदि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

             तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्जबारामती - ५१ उमेदवारांचे ६६ अर्जउस्मानाबाद - ३६ उमेदवारांचे ७७ अर्जलातूर - ३६ उमेदवारांचे ५० अर्जसोलापूर - ४१ उमेदवारांचे ५३ अर्जमाढा - ४२ उमेदवारांचे ५५ अर्जसांगली - ३० उमेदवारांचे ३९ अर्जसातारा - २४ उमेदवारांचे ३३ अर्जरत्नागिरी -सिंधुदुर्ग - ९ उमेदवारांचे १३ अर्जकोल्हापूर - २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज दाखल झाले आहेत.

 

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

 मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

            मुंबई दि.20: भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे,  अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे.

            यांमध्ये सर्वसामान्य माहितीअर्जाची स्थितिगतीमतदार ओळखपत्र प्राप्त न होणेनवीन मतदार नोंदणीमतदार यादीत नाव तपासणेस्थलांतर केल्यानंतर पत्त्यातील बदलविविध दुरुस्त्यानाव वगळणीमतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडणेमतदार ओळखपत्र हरवणेमतदार ओळखपत्राशी मोबाइल क्रमांक जोडणेइत्यादी विषयांच्या अनुषंगाने माहिती विचारणारे फोन आलेले आहेत.     आलेल्या फोनमध्ये सर्वसामान्य माहिती विचारणारे फोन सर्वाधिक होते. असे १३३२ फोन आले. सर्वसामान्य माहितीमध्ये मतदारसंघाचा संपर्क क्रमांक व पत्ताऑनलाइन अर्जाबाबत माहिती विचारली गेली. त्या खालोखाल अर्जाची स्थितिगती जाणून घेण्यासाठी ५०७मतदार यादीत नाव तपासण्यासाठी ५०३मतदार ओळखपत्र प्राप्त न झाल्याबद्दल ४७०नवमतदार नोंदणीसाठी ४५४ फोन आले. उर्वरित फोन संकीर्ण माहितीसाठी विचारण्यात आले.

            महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्यातून सर्वाधिक फोन आलेत्यांची संख्या १५७५ इतकी होती. ठाणे जिल्ह्यातून ९९१मुंबई शहरातून ५२०रायगडमधून १८२ आणि पुण्यातून १६३ फोन आले.

            १८००२२१९५० या मतदार साहाय्यता क्रमांकाशिवाय महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ०२२ - २२०२१९८७ आणि ०२२ - २२०२६४४२ हे दोन अतिरिक्त क्रमांकही मतदारांना त्यांच्या मनातील शंका व प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे आणि समाधानकारक उत्तरे देण्यात येत आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000

 गडचिरोलीत 111 वर्षाच्या फुलमती यांचे मतदान

जेष्ठ मतदाराचा उत्साह सर्वांसाठी आदर्शवत

 

            गडचिरोली दि.20 (जिमाका): 12-गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत.  त्यांचा  जन्म जानेवारी 1913 रोजीचा आहे. नातवाच्या  दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.

 

            लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत मतदानासाठी  बाहेर निघत होते. यातच तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत, या 111 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. वयोवृद्ध फुलमती सरकार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार  इतर  मतदारांपुढे एक आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. तर अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी फुलमती आजीचे अभिनंदन करत मतदान प्रक्रियेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहे. 


पर्यावरण संतुलन

 🙏भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳आता नाही तर कधीच नाही.

🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने

पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। *वृक्ष वल्ली आम्हा सोयरे* *वनचरे* ।।

🌳 *" निसर्ग मित्र व्हा "*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

 निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

 

            मुंबई, दि. १९ : लोकसभा निवडणुका निर्भिड व निःपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या मार्गातील महत्वाचा अडथळा म्हणजे काही समाज घटकांकडून मतदारांना देण्यात येणारी विविध आमिषे (उदा. पैसामौल्यवान वस्तूदारु इ.) आहेत. या आमिषांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना आखल्या असून त्याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाव्दारे दि.१ डिसेंबर २०२३ च्या पत्राद्वारे दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यांच्या स्तरावर कार्यरत केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील १९ अंमलबजावणी यंत्रणांच्या प्रत्येकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निवडणूक खर्च सनियंत्रण करण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे तपासणीकरीता अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद होण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली (Election Seizure Management System) विकसित केली आहे.

            या प्रणालीवर अंमलबजावणी यंत्रणा तसेच जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथक यांच्याद्वारे अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद करण्याकरीता निवडणूक खर्च राज्यस्तरीय समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथक यांना ऑनबोर्ड करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या १६०० हून अधिक फिरती पथके आणि दोन हजारहून अधिक स्थिर पथके कार्यरत आहेत. दि.१ मार्च २०२४ पासून निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणालीवर (Election Seizure Management System) अंमलबजावणी यंत्रणांद्वारे अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ


 

आंतरराज्यीय अंमलीपदार्थाचे रॅकेट उघड नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाची कारवाई

 आंतरराज्यीय अंमलीपदार्थाचे रॅकेट उघड

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाची कारवाई

 

            मुंबईदि. १९ केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अंमलीपदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आणि कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

            केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने कान्हूर मेसाई तालुका शिरुरजि.पुणे याठिकाणी एका संशयित वाहनाला अडवून त्यातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना एक गुप्त युनिट मिडगुलवाडीजिल्हा-पुणे येथे सापडले. याची तपासणी करताना त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेत अत्याधुनिक गोष्टी होत्यायामध्ये उपकरणेजनरेटरड्रायर इत्यादी साहित्य आढळून आले. पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळता.आंबेगावजि. पुणे येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. दोन्ही युनिट हे दुर्गम भागात जेथे वाहनाने पोहोचणे कठीण आहेअशा ठिकाणी होते. याबाबतच्या सविस्तर तपासात असे आढळून आले की या दोन्ही ठिकाणी अमंलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात होत्या.

            तसेच मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना त्याला अटक करण्यात आली. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळालीत्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि आक्षेपार्हय पुरावे सापडले आहेत. अवैध उत्पादित अल्प्राझोलम महाराष्ट्रतेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते. अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहकवर्ग याच्याकडून याची खरेदी होते.

            निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या अशा अवैध उत्पादनाला आणि वाहतुकीला अटकाव करणाऱ्या कार्यवाहीत मोठे यश मिळाले आहे.


Featured post

Lakshvedhi