सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 10 February 2024
ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....
ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....
आजकाल मी वृद्धांना हाडांची घनता मोजण्याचा सल्ला देत नाही, कारण त्यांना नक्कीच ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) असेल आणि वाढत्या वयाबरोबच त्याचे प्रमाण निश्चितपणे अधिकाधिक गंभीर होत जाईल आणि फ्रॅक्चरचा धोका नक्कीच वाढेल !
एक सूत्र आहे:
फ्रॅक्चरचा धोका = बाह्य नुकसान शक्ती / हाडांची घनता.
वृद्धांसाठी छेदातली(denominator) किंमत म्हणजे हाडांची घनता वयपरत्वे कमी होत चालली आहे, त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका निश्चितपणे वाढेल.
म्हणून, फ्रॅक्चर टाळण्यासाठी वृद्धांसाठी सर्वात महत्वाचे उपाय म्हणजे अपघाती जखम टाळण्यासाठी शक्य ते सर्व करणे !
अपघाती इजा कशी कमी करावी?
मी सारांशित केलेल्या तथाकथित रहस्याची सात पात्रे आहेत, ती अशीः
"सावध रहा, सावध रहा, पुन्हा सावध रहा"!
मी त्यासाठी सुचवत असलेल्या विशिष्ट उपायांमध्ये खालील उपाय प्रामुख्याने समाविष्ट आहेत -
1.उंचावरल्या वस्तू काढण्या- ठेवण्यासाठी खुर्चीवर किंवा कोणत्याही स्टूलवर कधीही उभे राहू नका.
2. पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा.
3. घसरणे टाळण्यासाठी आंघोळ करताना किंवा शौचालय वापरताना विशेष काळजी घ्या.
4. विशेषत: महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे - बाथरूममध्ये भिंतीचा किंवा इतर गोष्टींचा आधार घेऊन अंडरगारमेंट्स घालू नका, नका. हे त्यांच्या नितंबाचे सांधे घसरण्याचे आणि फ्रॅक्चरचे सर्वात महत्वाचे कारण आहे. आंघोळ केल्यानंतर तुमच्या चेंजिंग रूममध्ये परत या. खुर्चीवर किंवा पलंगावर आरामात बसा आणि नंतर अंडरगारमेंट्स घाला.
5. टॉयलेटला जाताना, बाथरूमचा मजला कोरडा आणि निसरडा नसल्याची खात्री करा. शक्यतो फक्त कमोड वापरा. कमोडच्या सीटवरून उठताना हाताने व्यवस्थित आधार घ्या. आंघोळ करताना शक्यतो स्टूल किंवा खुर्चीवर बसून करा.
6. मध्यरात्री उठताना, उठण्यापूर्वी 3-4 मिनिटे बेडवर बसा; प्रथम खोलीतील लाईट्स चालू करा आणि नंतर उठा.
7. किमान रात्री (शक्य असल्यास दिवसाही) कृपया शौचालयाचा दरवाजा आतून बंद करू नका. शक्य असल्यास शौचालयात अलार्म बेल लावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची मदत मागवण्यासाठी ती आठवणीने दाबा.
8. ज्येष्ठांनी पँट वगैरे घालण्यासाठी खुर्चीवर किंवा पलंगावर बसणे आवश्यक आहे.
9. चुकून खाली पडल्यास जमिनीचा आधार मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या हातांचा वापर केला पाहिजे. हिप जॉइंट, पायाचे हाड किंवा मानेला फ्रॅक्चर होण्यापेक्षा हाताला आणि मनगटाला फ्रॅक्चर होणे कधीही परवडते.
10. तुमच्यासाठी शक्य असेल त्या प्रमाणात व्यायाम (किमान चालण्याचा तरी) करण्याचे मी जोरदार समर्थन करतो.
11. विशेषतः महिलांसाठी.. तुमचे वजन मर्यादेत ठेवण्यासाठी खूप गंभीर व्हा. त्यासाठी आहारावर नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. 'उरलेले' संपवण्यासाठी भुकेपेक्षा जास्त खाणे टाळा. वजन नियंत्रणात ठेवणे तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनावर आहे. पोट भरेपर्यंत जेवण्यापेक्षा अर्धे पोट भरून खाणे बंद करणे केव्हाही चांगले.
12. बाथरूमच्या नॉन-स्लिप फ्लोअरवर विशेष लक्ष द्या. मुख्यत्वेकरून पायऱ्या चढताना- उतरताना हँडरेल्स वापरा. कारण तुमची एक घसरण तुम्हाला किमान दहा वर्ष त्रास देईल !
या उपयांसोबतच ज्येष्ठांसाठी व्हिटॅमिनरुपी औषधीऐवजी आहारातील पूरक आहार (उदा. दुग्धजन्य पदार्थ, सोया उत्पादने आणि सीफूड, विशेषत: लहान कोळंबीचे कातडे, ज्यात कॅल्शियम जास्त असते) यांचाही पुरस्कार मी नेहमीच करत असतो.
दुसरे म्हणजे बाहेरची कामे योग्य प्रकारे करणे, कारण सूर्यप्रकाशातील अतिनील(ultraviolet) किरणांमुळे त्वचेतील कोलेस्टेरॉलचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर होते. कॅल्शियमच्या आतड्यांतील शोषणास प्रोत्साहन देण्यासाठी हे फायदेशीर आहे आणि त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस पुढे ढकलला जाऊ शकतो.
माझा हा संदेश(मेसेज) थोडा लांबड लावलेला वाटू शकतो, परंतु ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांची मनापासून काळजी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांसाठीही साठी तो अत्यंत उपयुक्त आहे, हे नक्की.
*डॉ. श्रीजल शहा*,
*ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन*
{विशेष सूचना : कृपया हा मेसेज आपल्या इतर ग्रुप्मध्ये अवश्य पाठवा.}
डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!! ____________________________
डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!
____________________________
🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏
🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹
😊स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..
भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..
🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??
🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..
लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..
🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??
कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..
आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..
🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
आनंदवन
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही
महा खादी एक्स्पो’ लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा
‘महा खादी एक्स्पो’ लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा
- मुख्य कार्यकारी अधिकारी, आर.विमला
'दिलखुलास', ‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'मध केंद्र योजना' व 'महा खादी एक्स्पो 2024' विषयावर मुलाखत
मुंबई, दि.9 :महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मुंबईत 'महा खादी एक्स्पो 2024' चे आयोजन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मुंबईतील नागरिकांना वस्त्र, वस्तू, स्वाद आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार असून हा 'महा खादी एक्स्पो 2024' लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा ठरणार असल्याचे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सांगितले.
राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जिटेक्स ग्राऊंड 5 येथे 'महा खादी एक्स्पो 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात लघु उद्योग विकास महामंडळ, उद्योग संचालनालय व भारतीय लघु उद्योग विकास बँक तसेच एक जिल्हा एक उत्पादन यातील उद्योजकांचा सहभाग असणार आहे. मुंबईत परपडणाऱ्या 'महाखादी एक्स्पो 2024' चे नियोजन, यातील बाबींचा समावेश, मंडळाच्या 'मध केंद्र' योजनेला मिळालेली मान्यता, ही योजना, योजनेची अंमलबजावणी याबाबत 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात आर.विमला यांची मुलाखत सोमवार दि.12, मंगळवार दि.13 आणि बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/
यू ट्यूब - https://www.youtube.co/
0000
नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे
नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार
मुंबई,दि. 9, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
5 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दी तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम 2024 अस्तित्वात आणण्यास मान्यता देण्यात आली. या अधिनियमाबाबात काही संस्था व व्यक्ती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, या अधिनियमातील तरतूदीनुसार व्यवस्थापकीय समितीमधील सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातील असणार आहेत. शीख समुदायाचे अधिकारी, तज्ज्ञ, विचारवंत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या व्यक्तींचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. शीख (केशधारी) समुदायाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असणार नाही.
तसेच या समितीच्या अध्यक्ष निवडीबाबतही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील. तसेच शीख समुदायाच्या नियमानुसारच या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात येणारी व्यक्ती केशधारी असेल. नवीन समितीमध्ये एकूण 17 सदस्य असतील. त्यामध्ये 3 सदस्य निवडणुकीने निवडले जातील. दोन सदस्य शिरोमणी व्यवस्थापन समिती, अमृतसर यांच्याकडून तर राज्य शासनाद्वारे नियुक्त सदस्यही असतील.
या अधिनियमाबाबतचे विधेयक लवकरच विधानसभेमध्ये मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तरी या अधिनियमाबाबत पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या प्रचारास बळी न पडता शीख समुदायातील नागरिकांनी कोणतीही शंका मनात धरू नये, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.
कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर
कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई, दि. ९: कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.
या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...

