Saturday, 10 February 2024

ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....

 ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी अनावृत्त पत्र.....

आजकाल मी वृद्धांना हाडांची घनता मोजण्याचा सल्ला देत नाही, कारण त्यांना नक्कीच ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) असेल आणि वाढत्या वयाबरोबच त्याचे प्रमाण निश्चितपणे अधिकाधिक गंभीर होत जाईल आणि फ्रॅक्चरचा धोका नक्कीच वाढेल !


एक सूत्र आहे:


फ्रॅक्चरचा धोका = बाह्य नुकसान शक्ती / हाडांची घनता.


वृद्धांसाठी छेदातली(denominator) किंमत म्हणजे हाडांची घनता वयपरत्वे कमी होत चालली आहे, त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका निश्चितपणे वाढेल.


म्हणून, फ्रॅक्चर टाळण्यासाठी वृद्धांसाठी सर्वात महत्वाचे उपाय म्हणजे अपघाती जखम टाळण्यासाठी शक्य ते सर्व करणे !


अपघाती इजा कशी कमी करावी?


मी सारांशित केलेल्या तथाकथित रहस्याची सात पात्रे आहेत, ती अशीः


"सावध रहा, सावध रहा, पुन्हा सावध रहा"!


मी त्यासाठी सुचवत असलेल्या विशिष्ट उपायांमध्ये खालील उपाय प्रामुख्याने समाविष्ट आहेत -


1.उंचावरल्या वस्तू काढण्या- ठेवण्यासाठी खुर्चीवर किंवा कोणत्याही स्टूलवर कधीही उभे राहू नका.


2. पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा.


3. घसरणे टाळण्यासाठी आंघोळ करताना किंवा शौचालय वापरताना विशेष काळजी घ्या.


4. विशेषत: महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे - बाथरूममध्ये भिंतीचा किंवा इतर गोष्टींचा आधार घेऊन अंडरगारमेंट्स घालू नका,  नका. हे त्यांच्या नितंबाचे सांधे घसरण्याचे आणि फ्रॅक्चरचे सर्वात महत्वाचे कारण आहे. आंघोळ केल्यानंतर तुमच्या चेंजिंग रूममध्ये परत या. खुर्चीवर किंवा पलंगावर आरामात बसा आणि नंतर अंडरगारमेंट्स घाला.


5. टॉयलेटला जाताना, बाथरूमचा मजला कोरडा आणि निसरडा नसल्याची खात्री करा. शक्यतो फक्त कमोड वापरा. कमोडच्या सीटवरून उठताना हाताने व्यवस्थित आधार घ्या. आंघोळ करताना शक्यतो स्टूल किंवा खुर्चीवर बसून करा.


6. मध्यरात्री उठताना, उठण्यापूर्वी 3-4 मिनिटे बेडवर बसा; प्रथम खोलीतील लाईट्स चालू करा आणि नंतर उठा.


7. किमान रात्री (शक्य असल्यास दिवसाही)  कृपया शौचालयाचा दरवाजा आतून बंद करू नका. शक्य असल्यास शौचालयात अलार्म बेल लावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत  कुटुंबातील सदस्यांची मदत मागवण्यासाठी ती आठवणीने दाबा. 


8. ज्येष्ठांनी पँट वगैरे घालण्यासाठी खुर्चीवर किंवा पलंगावर बसणे आवश्यक आहे.


9. चुकून खाली पडल्यास जमिनीचा आधार मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या हातांचा वापर केला पाहिजे. हिप जॉइंट, पायाचे हाड किंवा मानेला फ्रॅक्चर होण्यापेक्षा हाताला आणि मनगटाला फ्रॅक्चर होणे कधीही परवडते. 


10. तुमच्यासाठी शक्य असेल त्या प्रमाणात व्यायाम (किमान चालण्याचा तरी) करण्याचे मी जोरदार समर्थन करतो.


11. विशेषतः महिलांसाठी.. तुमचे वजन मर्यादेत ठेवण्यासाठी खूप गंभीर व्हा. त्यासाठी आहारावर नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. 'उरलेले' संपवण्यासाठी भुकेपेक्षा जास्त खाणे टाळा. वजन नियंत्रणात ठेवणे तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनावर आहे. पोट भरेपर्यंत जेवण्यापेक्षा अर्धे पोट भरून खाणे बंद करणे केव्हाही चांगले.


12. बाथरूमच्या नॉन-स्लिप फ्लोअरवर विशेष लक्ष द्या. मुख्यत्वेकरून  पायऱ्या चढताना- उतरताना हँडरेल्स वापरा. कारण तुमची एक घसरण तुम्हाला किमान दहा वर्ष त्रास देईल !


            या उपयांसोबतच   ज्येष्ठांसाठी व्हिटॅमिनरुपी औषधीऐवजी आहारातील पूरक आहार (उदा. दुग्धजन्य पदार्थ, सोया उत्पादने आणि सीफूड, विशेषत: लहान कोळंबीचे कातडे, ज्यात कॅल्शियम जास्त असते) यांचाही पुरस्कार मी नेहमीच करत असतो.


दुसरे म्हणजे बाहेरची कामे योग्य प्रकारे करणे, कारण सूर्यप्रकाशातील अतिनील(ultraviolet) किरणांमुळे त्वचेतील कोलेस्टेरॉलचे व्हिटॅमिन डी मध्ये रूपांतर होते. कॅल्शियमच्या आतड्यांतील शोषणास प्रोत्साहन देण्यासाठी हे फायदेशीर आहे आणि त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस पुढे ढकलला जाऊ शकतो.


माझा हा संदेश(मेसेज) थोडा लांबड लावलेला वाटू शकतो, परंतु ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांची मनापासून काळजी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांसाठीही साठी तो अत्यंत उपयुक्त आहे, हे नक्की.



*डॉ. श्रीजल शहा*,

*ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन*


{विशेष सूचना : कृपया हा मेसेज आपल्या इतर ग्रुप्मध्ये अवश्य पाठवा.}

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi