सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 19 March 2023
पटल तर व्हाय म्हना
*गृहिणी म्हणजे गृहिणी असतात..*
*नसतात इंजिनीअर पण,*
पिठाच्या गोळ्याचा त्रिकोन करून पोळी मात्र गोल लाटतात..
*नसतात शास्रज्ञ पण,*
हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे मोजमाप अचूक ठेवतात..
*नसतात डाॅक्टर पण,*
कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात..
*नसतात शिक्षक पण,*
संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात..
*नसतात पोलिस पण,*
मुलां बरोबर नवर्यावरही बारीक लक्ष ठेवून असतात..
*नसतात गायक पण,*
मुलांसाठी अंगाई हमखास गातात..
*नसतात वादक पण,*
राग आला की भांडी आपटून तांडव करतात..
*नसतात अर्थतज्ञ पण,*
नवर्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीचा ताळमेळ ठेवतात..
*नसतात पंडीत पण,*
देवधर्म, पुजाअर्चा, रितीरिवाज, सणवार यांचे औचित्य साधतात..
*नसतात परिचारीका पण,*
वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करतात..
*नसतात लेखक पण,*
सर्वांशीच सुसंवादाने प्रेमळ नाते जपत गाथा रचित असतात..
*असतात जिद्दी हट्टी पण,*
चिऊ,काऊ, माऊ बरोबरच शेजार्यांशीही असते गट्टी..
*सहनशील अन् संयमी पण,* एवढ्याशा भांडवलात पण नातेसंबधांचा व्यवहार चोख बजावतात..
*प्रेम आणि आपुलकीच्या* जोरावर संसाराचा गाडा हाकत असतात..
*संसाराची गुरुकिल्ली कमरेला* लावून "राजाच्या घरात राणीचं राज्य" करत असतात..
*खरचं पुरूषांच्या पेक्षा ग्रेट या गृहिणीच असतात....*😊
Saturday, 18 March 2023
हार्ट - ब्लाँकेजेससाठि.. उपाय*
*हार्ट - ब्लाँकेजेससाठि.. उपाय*
.. साहित्यः..
१) एक कप लिंबू रस
२) एक कप लसूण रस
३) एक कप आल्याचा रस
४) एक कप अँपल व्हिनेगार
.... हे सर्व एकत्र लहान आचेवर उकळायच, ४ कप चे ३ कप होईपर्यंत आटवून घ्यायचं आणि थंड करून ३ कप मध मिक्स करावे. हे बाटलित भरून ठेवा.
व रोज सकाळी उपाशि पोटि २ चमचे घ्यावे..
उपाय..२
हार्ट बळकट व संपूर्ण ब्लाँकेजेस जाण्याचा प्रभावि ऊपाय..
..... साहित्य-/ दोन बंगला पान देठासहित,, दोन लसूण कळ्या, पाच ग्रँम अद्रक, व दोन चमचे मध,
...... क्रुति-/
.... पाटा- वरवंट्यावर वरिल तिन गोष्टि घेऊन चटणि सारखे पातळ वाटावे.... मग यात दोन चमचे मध मिसळावे.. आणि एकदम प्यायचे नाहि...
..... पंचेचाळिस मिनिटात हळूहळू
चाटण , बोटाने चाटत संपवायचे...
पुढे एक तास काहिहि खायचे नाहि...
..... नेहमिकरता ब्लाँकेजेस वितळून निघून जातात...
..... परीक्षित उपाय... सूचना..
चेक करत राहावे.. व क्लिअर होईपर्यंत उपचार करावा....
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ
लहान मुलांना बध्दकोष्ठ,संडास ला खडे होणे*
*लहान मुलांना बध्दकोष्ठ,संडास ला खडे होणे*
लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर हे सोपे उपाय करा.
१)एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले मळाचे खडे 10-15मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही.
२)एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी गुदद्वारा त भरल्यास ही अथवा एरंडेल पोटात घेतल्यास ही फरक पडतो .
हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे व जास्त दिवस नाही.
*लहान मुलांना एनिमा वगैरे कधीच देऊ नये.*
वैद्य. गजानन
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ
प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार
प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.
मुंबई, दि. १६ : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागावर चर्चा झाली. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील 148 महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांना शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे राज्याचे भविष्य आहेत. यांना समान वागणूक मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विज्ञान नगरी प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत शासन सकारात्मक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देशाच्या, राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा पुरस्कार रकमेत जवळपास पाच पट वाढ केली आहे.
आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यात येणार असून यासाठी निधीची उपलब्धता केली आहे.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
0
मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय
*मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*
*उदास आहात का ?*
मग serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रित येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.
*मसाज-* मसाज घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
*दूध-* दूधपिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.
*झोप-* अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.
*हळद-* यामध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.
*काळामिरी-* यामध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.
*व्यायाम-* serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.
*डॉ. प्रमोद ढेरे*
*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*
_*(कॉपी पेस्ट)*_
*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*
*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*
*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*
https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

