Tuesday, 8 November 2022

एसएनडीटी विद्यापीठात मंगळवारी महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

 एसएनडीटी विद्यापीठात मंगळवारी महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

            मुंबई, दि.7 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे महा विधी सेवा शिबीर आणि महा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.


            या प्रदर्शनीमध्ये शासकीय विभागांचे विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या स्टॉलवर विभागांकडून जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


            उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून यावेळी न्यायमूर्ती अनिल सुब्रमण्यम व न्यायमूर्ती स्वाती चव्हाण, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर व मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची प्रमुख उपस्थ‍िती राहणार आहे.


            विविध विभागांच्या स्टॉलवर देण्यात येणाऱ्या माहितीचा मुंबईतील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहरचे सदस्य सचिव अनंत देशमुख यांनी केले आहे.


००००

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी

 अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि 7 :- देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर विभागाची आढावा बैठक झाली.

            यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य मनोज सौनिकराज्य कर आयुक्त राजीव कुमार मित्तलसचिव

श्रीमती शैला एविशेष राज्य कर आयुक्त अनिल भंडारीसह आयुक्त सी वन्मथीसचिव डॉ श्रीकर परदेशी तसेच वस्तू व सेवा कर विभागाचे अपर राज्य कर आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेराज्यातील जीएसटी करसंकलनात वाढ झाली आहे. जीएसटी करचुकवेगिरीवर व चुकीचा परतावा घेणा-यांवर आळा घालण्यासाठी विभागाने कठोर उपाययोजना कराव्यात. करचुकवेगिरी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. करचुकवेगिरी रोखण्यासाठी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिटकडे त्याअनुषंगाने विभागाने आपल्या गरजा मांडाव्यात. त्यानुसार विभागाला नक्कीच मदत करण्यात येईल.

            विभागासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान नक्कीच उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री फडणवीस यांनी सांगितले. विभागातील रिक्त पदे भरतीप्रक्रियेला तसेच कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासही गती देण्यात यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले.

            राज्यातील जीएसटी करसंकलनात वाढ झाली असून राज्याने 22 हजार कोटी रु. प्रतिमाह टप्पा गाठला आहे. राज्यात नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्याही वाढली आहे. विवरण पत्र भरणा-यांची संख्याही वाढली आहे.

            ई-वे बिल अनुपालनातही 12 कोटी प्रतिमाहपर्यत लक्षणीय वाढ झाली आहे. अन्वेषणात्मक प्रणाली आधारे  करचुकवेगिरी रोखण्यासाठी विभागामार्फत सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून प्रकरणांचा निपटारा त्वरित करण्यात येत आहे. तसेच करदात्यांच्या तक्रारींचे निराकरणही त्वरित करण्यात येत आहे. विवरण पत्र पडताळणी व लेखा परीक्षणाचे काम विभागाने हाती घेतले आहे. विभागाने राबविलेल्या अभय योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला. जीएसटी करप्रणालीत विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. जीएसटी ऑडीटचे पॅरामीटर्स ठरविण्यात आले असून या ऑडीटमध्येही राज्य अग्रेसर आहे. करचुकवेगिरी करणा-याचुकीचा करपरतावा घेणा-या 68 व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

- - - 000 - - -


जिंदगी




 

सुदिन

 *वक्त,*

*ख्वाहिशें,*

*सपने...।*

*हाथ में बंधी घङी की,*

*तरह होते हैं...।*


*जिसे हम उतार कर,*

*रख भी दें तो भी,*

*उनका चलना रुकता नहीं...।*


   *🌞🌺🌸 सुदिनम् 🌸🌺🌞*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

   *🍁•┈✤शुभ सकाळ✤┈•🍁*

Monday, 7 November 2022

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा बुधवारी पुणे येथे शुभारंभ

 मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा

बुधवारी पुणे येथे शुभारंभ

-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

            पुणे, दि. 7 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


            शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.


            मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त या ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.


            उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजेवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योगसंस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी करण्यासाठी, मतदार नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ येथे १० नोव्हेंबर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.


            पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.


            भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये केलेल्या सुधारणेनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पात्र मतदारांच्या अर्जावर वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल.


            छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभा निमित्ताने भारत निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केले आहे.


0000





 



कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेनेआर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे

 कृषीआरोग्यशिक्षणऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेनेआर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्यदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

            मुंबईदि. :राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषीआरोग्यशिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            वर्षा निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात कृषीसायबर सुरक्षासौरऊर्जाउत्पादन आधारित उद्योग, गुंतवणूकजागतिक दर्जाचे शिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेराज्य शासनाने कृषीशिक्षणआरोग्यमाहिती व तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधारोजगार निर्मिती या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई मेट्रोसमृद्धी महामार्गमुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळत आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन सिंचनाखाली आणताना कृषी क्षेत्राला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            कृषीसायबर सुरक्षासौरउर्जाजागतिक दर्जाचे शिक्षणमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करून महाराष्ट्रासोबत दीर्घकालीन संबंध जपण्यासाठी प्रयत्न करूअसे श्री. हॅंकी यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी श्री. हॅंकी यांनी हिंदीतून मुख्यमंत्र्यांशी अधून मधून संवाद साधला. त्यांच्या हिंदीला दाद देत ‘तुम्ही मुंबईत राहून लवकरच मराठी शिकाल’असे मुख्यमंत्र्यांनी श्री. हँकी यांनी सांगितले.

000


 

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान.

 महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली 07 ; आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. यातील मनिषा जाधव, राजश्री पाटील, अल्का कोरेकर या तीन परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


        वर्ष 2021 चे राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 50 परिचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.


        सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) यांना आरोग्य क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांची प्रभावीरित्या अंमलबजावणी केलेली आहे. श्रीमती जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


        जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक (एलएचवी) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. श्रीमती पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


        पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका (वीएचएन) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांनाही फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीमती कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिक काळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सध्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारीका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये तसेच लातूर येथे आलेल्या भुकंपाच्या प्रसंगी पुनर्वसन झालेल्या रूग्णांची सेवा श्रीमती कोरेकर यांनी केली आहे. सन 2018 मध्ये त्यांना युनिसेफतर्फे लसीकरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याबाबत अ दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोविड काळात केलेल्या रूग्ण सेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने विविध 4 पुरस्कार तर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीनेही त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.


            अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला होता. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.


महाराष्ट्राची सुपूत्री मीरा धोटे यांना फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार


            मूळ नागपूरच्या असणा-या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षापासून त्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोविडच्या काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात श्रीमती धोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.  


            प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2021 असून एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.


००००


 

Featured post

Lakshvedhi