Monday, 7 November 2022

कृषी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेनेआर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे

 कृषीआरोग्यशिक्षणऊर्जा क्षेत्रासाठी अमेरिकेनेआर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्यदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

            मुंबईदि. :राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषीआरोग्यशिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            वर्षा निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात कृषीसायबर सुरक्षासौरऊर्जाउत्पादन आधारित उद्योग, गुंतवणूकजागतिक दर्जाचे शिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेराज्य शासनाने कृषीशिक्षणआरोग्यमाहिती व तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सुविधारोजगार निर्मिती या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई मेट्रोसमृद्धी महामार्गमुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधांमुळे औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळत आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन सिंचनाखाली आणताना कृषी क्षेत्राला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे. शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            कृषीसायबर सुरक्षासौरउर्जाजागतिक दर्जाचे शिक्षणमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करून महाराष्ट्रासोबत दीर्घकालीन संबंध जपण्यासाठी प्रयत्न करूअसे श्री. हॅंकी यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी श्री. हॅंकी यांनी हिंदीतून मुख्यमंत्र्यांशी अधून मधून संवाद साधला. त्यांच्या हिंदीला दाद देत ‘तुम्ही मुंबईत राहून लवकरच मराठी शिकाल’असे मुख्यमंत्र्यांनी श्री. हँकी यांनी सांगितले.

000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi