Saturday, 24 September 2022

समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस

 समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग ' होणार : देवेंद्र फडणवीस

'नरेडको'च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती

 

        नागपूर दि.२४ : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

            नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली -मेरिडियन हॉटेल येथे बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध गटातील उपलब्धीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार सोहळा पार पडला.

            या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार सर्वश्री परिणय फुके, मोहन मते,  विजय दर्डा, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेळकर, उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, विजय दर्डा, महारेराचे संस्थापकीय प्रमुख गौतम चॅटर्जी, विदर्भ नरेडकोचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रीजमोहन तिवारी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

            नागपूर हे शहर 'लॉजिस्टिक हब ' म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात 'लॉजिस्टिक सपोर्ट ' तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे 'एक्सप्रेस 'महामार्ग तयार करण्याचे सुतोवाच केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर ', म्हणून विकसित होणार आहे. यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर 'तयार होत आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर- दिल्ली आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर,नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येणार आहेत. त्यामुळे हरितपट्ट्यांचा बचाव करत नवीन शहरे वसवली पाहिजे. याकडे बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.

             महारेरा सारख्या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिक व विकासक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. विश्वासार्हता वाढली. रेरामुळे बांधकाम विकासक क्षेत्रात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राज्य झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेल्या भरारीचे कौतुक केले आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे झपाट्याने विकसित होत आहेत. बांधकाम व्यावसायिक व विकासकांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे  त्यांनी सांगितले.

            बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि हरित पट्टे सांभाळात तयार होणारी विस्तारित शहरे बनविण्याकडे लक्ष द्यावे,असे आवाहन फडणवीस यांनी केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांना विविध गटात यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.

00000

                                     

ग्लेशिअर वर सॅटेलाईट बेस इंटरनेट सेवा

 भारतीय सेनेने काल जगातील सगळ्यात उंचावर असलेल्या युद्धभूमीवर म्हणजेच सियाचीन ग्लेशिअर वर सॅटेलाईट बेस इंटरनेट सेवा चालू केली असल्याचं स्पष्ट केलं आहे. तब्बल १९,०६१ फूट  (५८०९ मीटर) उंचीवर भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना २४ तास ३६५ दिवस इंटरनेट  उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे त्यांचा बेसशी आणि कमांड सेंटरशी असलेला संपर्क अजून चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होणार आहे. 


बी.बी.एन.एल. या भारत सरकारच्या उपक्रमातून ही सेवा देण्यात येते आहे. सॅटेलाईट इंटरनेट सेवेत माहितीच आदान प्रदान हे थेट भूस्थिर उपग्रहमार्फत होत असते. हे उपग्रह पृथ्वीपासून जवळपास ३६,००० किलोमीटर च्या कक्षेत स्थापन केलेले असतात. यांच्या परिवलनाचा आणि पृथ्वीच्या परिवलनाचा वेग सारखा असल्याने त्यांच्याकडून सतत संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. भारतीय सेनेच्या सियाचीन नेटवर्कसाठी इसरो चे जीसॅट ११ आणि जीसॅट २९ हे उपग्रह वापरण्यात येणार आहेत. 

सॅटेलाईट इंटरनेट हे बाकीच्या प्रणालीपेक्षा स्वायत्त असल्याने इतर नेटवर्क काही कारणाने बंद झाल्यावर ही हे नेटवर्क काम करत रहाते. ज्या भागात फायबर नेटवर्क किंवा इतर कोणत्याही मार्गाने नेटवर्क प्रस्थापित करणं शक्य नसते. तिकडे अश्या पद्धतीचं नेटवर्क वापरण्यात येते. येत्या काळात इसरो फक्त भारतीय सेनेसाठी एक उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. ज्यावर फक्त भारतीय सेनेला संपर्कासाठी ट्रान्सपॉन्डर देण्यात येणार आहेत. ज्यामुळे लेह- लडाख सारख्या अतिदुर्गम क्षेत्रात संपर्क अजून सक्षम होण्यास मदत होणार आहे. 

जय हिंद!!! 🇮🇳

विनीत वर्तक

Advance मध्ये वर्ष श्राdha

 


लम्पीचा प्रभाव

 लम्पीचा प्रभाव गोवर्गीय जनावरांमध्ये अधिक

लम्पी आजारास घाबरण्याची गरज नाही

 

            मुंबईदि.२४: लम्पी आजार केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार आढळून आलेला नाही. हा आजार प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने लम्पी आजार  होण्याची भीती नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

            मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले, असून ती जनावरे आता रोगमुक्त झाली आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.

             मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण 3226 गोवर्गीय जनावरे असून 3206 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. या उपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 1916,  022 2556 3284, 02225563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. पेठे यांनी केले.

 

00000

लम्पीचा प्रभाव गोवर्गीय जनावरांमध्ये अधिक

लम्पी आजारास घाबरण्याची गरज नाही

 

            मुंबई, दि.२४: लम्पी आजार केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार आढळून आलेला नाही. हा आजार प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने लम्पी आजार होण्याची भीती नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

            मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले, असून ती जनावरे आता रोगमुक्त झाली आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.

             मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण 3226 गोवर्गीय जनावरे असून 3206 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. या उपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 1916, 022 2556 3284, 02225563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. पेठे यांनी केले.

 

00000


वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन

 राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार

                        - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

 

          मुंबई दि 24 : सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

               वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असूनयासंदर्भातील कामाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त विरेंद्र सिंहआयएफसीचे प्रतिनिधी पंकज सिंन्हाहर्षा कुंभचंदानी उपस्थित होते.

               श्री. महाजन म्हणाले कीराज्य शासनाने सन 2030 पर्यंत सर्वांना परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा (Tertiary Helath care) पुरविण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे राज्य शासनाने निश्चित केले असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय विकसित करणे आणि सर्वांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे याकरिता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना महाराष्ट्र शासनाचे रणनीती सल्लागार म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे.

               सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर राज्यात वैद्यकीय महाविद्यालयेसुपर स्पेशालिटी रूग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात गती देण्यात द्यावी, असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले.

               मंत्री गिरीश महाजन म्हणालेआरोग्य सेवा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारणे आणि आरोग्य सेवा विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. २०३० पर्यंत सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा पुरविणेवैद्यकीय शिक्षणाचे व आरोग्य सेवांचे राज्यभरात श्रेणीवर्धन करणेविद्यमान मनुष्यबळामध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि काही उद्दीष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा विकसीत करणे ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची उद्दीष्टे ठरविण्यात आली आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

 

            लातूरनागपूरयवतमाळ आणि औरंगाबाद येथे उभारण्यात आलेली अतिविशेषोपचार रूग्णालये तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी व त्यासंदर्भातील अहवाल कालमर्यादेत सादर करण्यात यावेत. जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री श्री. महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

00

सेवा योजना

 महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांनाराष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 24 : महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुशिल शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांनाराष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिक हा नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा  विद्यार्थी  आहे.  दिवेश हा नागपूर येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनच्या दरबारहॉल मध्ये राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2020- 21प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाचे  सचिव संजय कुमार आणि क्रीडा विभागाच्या  सचिव सुजाता चतुर्वेदी  उपस्थित होत्या.

या विशेष कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण 42 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यात मुंबई  येथील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूप श्री. शिंदे यांना रजतपदकप्रमाणपत्र आणि  दीड लाख रुपये तर डॉ. चक्रवर्ती यांना चषक आणि 2 लाख रुपये प्रदान करण्यात आले. 

श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कंपोस्टिंगऊर्जा संरक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केले. शेतकऱ्यांनी  पिकविलेल्या सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणेरक्तदान शिबीर आयोजन आणि वृक्षारोपण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत देशभरातील 30 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या श्रेणीत महाराष्ट्रातून नंदुरबार येथील प्रतिक कदम आणि नागपूर येथील विद्यार्थी दिवेश गिन्नोर यांनाही गौरविण्यात आले. प्रत्येकी रजतपदक, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिक कदम यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी हजारांहून अधिक सापांचा तसेचमोर आणि बिबट्यांच्या पिलांचा जीव वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. कोविड महामारीच्या काळात स्वत: मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप केले. कोविड प्रतिबंधात्मक  लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांनी  लसीकरणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले. त्यांनी रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

दिवेश गिन्नारे यांनी शासनाच्या सांप्रदायिक सौहार्द निधी मध्ये 11 हजार 688 रुपये  गोळा करून जमा केले. गिन्नारे यांनी  विविध जनजागृतिविषयक कार्यक्रमात हिरीरीने


सहभाग घेतला.

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी

 तुम्ही जिथे सदस्य आहात त्या प्रत्येक ग्रुपवर पोस्ट करा.


जर तुम्हाला, जन्मापासून मूकबधीर असलेले कोणतेही मूल माहित असेल तर आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे अशा मुलाला बरे करणे शक्य झाले आहे.


शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख खर्च येतो, परंतु काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी, जिल्हा 3141 च्या मदतीने, ही शस्त्रक्रिया SRCC हॉस्पिटल, मुंबई येथे विनामूल्य केली जाते.


कृपया इतर ग्रुपवर पोस्ट करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत संदेश पोहोचेल.


संपर्क :-

रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी

DG Rtn राजेंद्र अग्रवाल

9820085149

सादर.  🙏


*मेसेज महत्वाचा आहे,शक्य तितका पुढे पाठवा ही विनंती!* 🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi