सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 24 August 2022
Tuesday, 23 August 2022
पशुधन
विधानपरिषद प्रश्नोत्तरे :
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या
निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक घेणार
- पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील
मुंबई, दि. 23 : अकोला जिल्ह्यातील मागील 18 वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूरला हलविण्याच्या निर्णयाबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
अकोला येथील पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर येथे हलविण्यात आल्या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री श्री विखे पाटील बोलत होते.
या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुके, डॉ. रणजित पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
क्रीडा पदे
राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे पंधरा दिवसात भरणार.
- क्रीडा मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 23 : राज्यातील क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे 15 दिवसाच्या आत भरली जातील अशी माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना क्रीडा मंत्री श्री महाजन बोलत होते.
क्रीडा मंत्री श्री. महाजन म्हणाले , महाराष्ट्र शासनाने 2003 च्या शासन निर्णयाद्वारे तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा धोरणत्मक निर्णय घेतला असून राज्यात 380 तालुका क्रीडा संकुले मंजूर आहेत. सद्य स्थितीत राज्यात 100 क्रीडा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून यापैकी फक्त 20 टक्के पदे भरलेली आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन येत्या आठवड्यात नागरी सेवा मंडळाची तातडीने बैठक घेऊन 44 पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 15 पदांची मुलाखत प्रक्रिया या महिनाअखेर पूर्ण होईल. अशी 69 पदे उपलब्ध होणार असल्याचेही श्री महाजन यांनी सांगितले.
राज्यातील जुन्या आणि नवीन तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांना देण्यात येणाऱ्या निधीच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार असल्याचेही श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
राज्यामध्ये क्रीडा धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘सी एस आर’ च्या माध्यमातून क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहिर, राम शिंदे, संजय आजगावकर, सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.
000000
सीएमआयए वतीने एमआयडीसी अधिकार्यांसमवेत उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक
औरंगाबाद : एमआयडीसी अधिकारी आणि उद्योग/उद्योग संघटना प्रतिनिधींची बैठक सोमवार, दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) येथे आयोजित करण्यात आली होती. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री राजेंद्र जोशी आणि कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. वाळूज, रेल्वे स्थानक, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील सीएमआयए सदस्यांनी उद्योगविषयक विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, पाणी पुरवठा, ट्रक तर्मिनाल्ची गरज, मोठ्या वाहनांची पार्किंग आणि त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक समस्या, उद्योग वसाहतीमधील मुरूम चोरी आणि इतर गुन्हे आदी विषयाचा समावेश होता. यावेळेस बोलतांना एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, कार्यकारी अभियंता गिरी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देतांना एमआयडीसी कार्यायाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजना या बाबत सविस्तर मांडणी केली. याप्रसंगी बोलतांना सीएमआयएचे माजी अध्यक्ष कमलेश धूत यांनी या बैठकी मागची संस्थेची भूमिका मांडली तसेच आगामी काळात अधिकारी आणि उद्योजक यांच्यामध्ये दुवा बनण्याचे काम संस्था करेल अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात बोलतांना प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी म्हणाले एमआयडीसी कार्यायाकडून कोरोन नंतरच्या काळात औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, स्टोर्म वॉटर डक्ट, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधाच्या विकासाकरिता सुमारे ३२ कोटी खर्च करण्यात आले, आगामी काळात ४२ कोटीचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, लिंक रोड विस्तारीकरण, आणि पावसाचे पाणी साचू नये याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. वाळूज येथे कार्बन तंत्रज्ञानावर आधारित त्रिटमेंट प्लांट विकसित करून त्यामधून 5 MLD पाण्याचा पुनर्वापर करण्याकरिता शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिकलठाणा वसाहतीसाठी नवीन पाईपलाईन
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जल वाहुनीला ३0-३५ वर्षे झाली असून अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली आहे. यामुळे उपसा क्षमता ५०% पर्यंत कमी झाली. मागील काळात एकीकडे उद्योगाला कमी पाणी उपलब्ध असतांना मानवतेच्या दृष्टिकोनामधून मान्पाकरिता २-३ एमएलडी पाणी देण्यात आले. यावरउपाय म्हणून वाहन क्षमता कमी झालेली जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी यांनी दिली. एकूण 22 किमी लांबीची नवीन पाईपलाईनटाकण्यात येईलयापैकी १५किमी लाम्बिंचे पाईपउपलब्ध झाले असून, ६ किमी लांबीचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
जळगाव एमआयडीसी धर्तीवर सेवा
याप्रसंगी प्रश्न मांडतांना चिकलठाणा वसाहती मधील उद्योजकांनी एमआयडीसी आणि मनपा यांच्याकडे सेवा विखुरल्या गेल्या असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मत व्यक्त केले. यावर बोलतांना एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ही वषात मनपाकडे हस्तांतरित केली असल्यामुळे पाण्याव्यतिरिक्त इतर सेवा मनपाच्या वतीने पुरवण्यात येत असल्याचे सांगितले. जर उद्योजकांची तयारी असेल तर सेवा हस्तांतरित करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र द्यावे, जळगाव एमआयडीसीच्या धर्तीवर सेवा देता येऊ शकतील असे मत व्यक्त केले.
सीएमआयएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या समन्वयक बैठीकीबद्दल एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संस्थेचे आभार मांडले. या वेळेस सीएमआयएतर्फे एमआयडीसी संस्थेने ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अधिकार्यांचा विशेस सत्कार केला. याप्रसंगी माजी अध्यक्ष कमलेश धूत, दीपक तोष्णीवाल आणि इतर सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती
Photo 2: उपस्थित उद्योजक सदस्य






