सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 13 May 2022
किमान आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी
शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करावी
- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई, दि ११ : किमान आधारभुत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख 94 हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी १७ मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे , द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौ.भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी(वॅपको) नागपूरच नाफेडचे श्री.पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख मे टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत. यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनचा उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हरभरा ५२३० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, दिनांक १ मार्च पासून ७३० खरेदी केंद्रांवर हरभरा (चना) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
0000
संदेश
*🌻धम्म संदेश ज्ञ🌻*
"न हि वेरेन वेरानि,
सम्मन्तीध कुदाचनं ।
अवेरेन च सम्मन्ति,
एस धम्मो सनन्तनो ।"
- तथागत बुद्ध
*इस संसार में वैर से वैर कभी शान्त नहीं होता, मैत्री से ही (वैर) शान्त होता है। यही संसार का सनातन नियम है।*
मन को मंगल कामनाओं से भर देने को भगवान बुद्ध *'मैत्री भावना'* कहते हैं ।
भिक्षुओं को सम्बोधित करते हुए तथागत बुद्ध ने कहा-
भिक्षुओ ! मैत्री रखने में ग्यारह लाभ है?
कौन-से ११ लाभ है?
*🍀मंगल मैत्री के 11 लाभ🍀*
मैत्री भावना करनेवाला :
*🍀1. सुख की नींद सोता है।*
*🍀2. तरोताज़ा जागता है।*
*🍀3. दुःस्वप्न नहीं देखता है।*
*🍀4. मनुष्यों में प्रिय होता है।*
*🍀5. अमनुष्यों में प्रिय होता है।*
*🍀6. देवता उसकी रक्षा करते है।*
*🍀7. अग्नि, विष, शस्त्र उसे मार नहीं सकते। ( यानी कोई शत्रु नहीं होने के कारण कोई उसे अग्नि, विष, शस्त्रसे नही मारते है।)*
*🍀8. सहज समाधिस्थ हो सकता है।*
*🍀9. मुख का वर्ण निखरता है। मुखाकृति शांत होती है।*
*🍀10. बेहोशी में नहीं मरता है।*
*🍀11. मरने के बाद अच्छी गति होती है ।*
🙏🏻🙏🏻🙏🏻
सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठीजलसंपदा विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.
मुंबई, दि. 12 : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. यासाठी बाणकोट खाडी परिसरातील नौकानयन सुलभ होण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
सावित्री नदीच्या मान्सूनपूर्व तयारीचा श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. गौतम, पूर नियंत्रण समिती रायगड चे सदस्य आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
महाड जवळ बाणकोट खाडीत नौकानयन सुलभ होण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि राजेवाडी ते केंबुर्ली या भागात सावित्री नदीतील गाळ आणि बेटे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. यातील मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सीआरझेड मधील तरतुदींनुसार मेरीटाईम बोर्ड मार्फत सुधारित प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
00000
कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी
- मंत्री आदित्य ठाकरे.
मुंबई दि. 12 :- मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर विविध टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा मंत्री श्री. ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धन यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. ठाकरे यांनी मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

