Thursday, 18 November 2021

 संपूर्ण राज्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या व राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून 95 वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या वार्षिक निवडणूक प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष व नाशिक जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल 21 जागा वगळता संपूर्ण राज्यातील निवडणुका बिनविरोध झाल्या असून, चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर वर  निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिल च्या 92 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती, या निवडणूक प्रक्रिया मधील अर्ज माघारी घेण्याच्या वाढीव मुदतीनंतर आज निवडणूक अधिकारी सागर नागरे यांनी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची व निवडणूक होणार्‍या विभागातील वैध उमेदवारांची यादी जाहीर केली.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या महाराष्ट्र चेंबर चे 40 वे अध्यक्ष म्हणून ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली असून, वरिष्ठ उपाध्यक्षपदी उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
व्यवस्थापन समितीतील उपाध्यक्ष पदासाठी मुंबई (1) विभागातून करुणाकर शेट्टी, मुंबई (2) विभागातून शुभांगी तिरोडकर, पश्‍चिम महाराष्ट्र विभागातून रवींद्र मानगावे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या असून, उत्तर महाराष्ट्र विभागातील एक उपाध्यक्ष व नाशिक जिल्ह्याच्या 21 जागा वगळता गव्हर्निंग कौन्सिलच्या उर्वरित 71 जागी उमेदवारांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
कोल्हापूर विभागातून गव्हर्निंग कौन्सिलवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये वस्त्रोद्योग  क्षेत्रात गेले अनेक वर्षे प्रचंड कार्य उभे केलेले माजी वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश  आवाडे, इंजिनिअरिंग उत्पादन क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले उद्योग जगतातून निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव (कोल्हापूर) यांचाही समावेश आहे. जालना विभागातून गव्हर्निंग कौन्सिलवर निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कालिका स्टील चे घनश्याम गोयल, मेटारोल स्टीलचे द्वारकाप्रसाद सोनी यांचा समावेश आहे. ललित गांधी यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून गव्हर्निंग कौन्सिलवर विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड केली असून, गव्हर्निंग कौन्सिलची रचना सर्वसमावेशक अशा पद्धतीने करण्यात यश मिळवले आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या 95 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या आतापर्यंतच्या व सध्या हयात असलेल्या अध्यक्षांपैकी एखादा अपवाद वगळता सर्वच माजी  अध्यक्षांनी एकत्रित येऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या ‘शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनल’ ला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला, ही या निवडणुकीतील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे.
निर्विवाद बहुमतासह अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या ललित गांधी यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन काम करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर चे मुख्य  काम हे व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करण्याचे आहे. त्यामुळे अशा संस्था निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत. परंतु नाशिक विभागात हे घडु शकले नाही व चेंबर ला या विभागासाठीची निवडणुक प्रक्रिया राबविणे भाग पडले आहे. तथापि तीन चतुर्थांश बहुमतासह संपुर्ण राज्यातील सभासदांनी दिलेले भक्कम पाठबळ याच्या जोरावर महाराष्ट्र चेंबर राज्यातील छोट्यात छोट्या उद्योजकासह सर्वच घटकांच्या विकासासाठी अविरत कार्यरत राहुन व महाराष्ट्राला देशात सर्वोच्च स्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

 महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची ८.८९ टक्के दराने परतफेड



            मुंबई,दि.30 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८९ टक्के कर्जरोखे २०२१ ची परतफेड दि.५ ऑक्टोंबर २०२१ रोजी पर्यंत आहे असे वित्त विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचना क्र. एलएनएफ-१०,११/प्र.क्र.२/अर्थोपाय दि. ३० सप्टेंबर २०११ अनुसार ८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि.४ ऑक्टोंबर२०२१ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. ५ ऑक्टोंबर२०२१ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटटी  जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ०५ ऑक्टोंबर २०२१ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान है,इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

         तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत:

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली."

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल,त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्‌वारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधानसचिव राजगोपाल देवरा यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

0000


 लोकराज्यचा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

 

            मुंबई,  दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील पुनरीक्षण कार्यक्रमनोंदणी करामतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन  झाले.

            लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूकांमध्ये मतदार म्हणून आपला हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या नावाची नोंदणी 1 ते 30 नोव्हेंबर 2021  दरम्यान निवडणूक मतदार यादीमध्ये केली जात आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यभर विशेष संक्षिप्त ‘पुनरीक्षण कार्यक्रम’ राबवला जात आहे. या कार्यक्रमाविषयी व मतदार नोंदणीविषयी महत्त्वपूर्ण माहिती या अंकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा पुन्हा सुरूलसीकरणई-पीक पाहणीकृषी यशकथासौरऊर्जेतून महावीजनिर्मितीरक्तदानमराठी रंगभूमी दिनस्पर्धा परीक्षा आदींविषयीचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.  शिवाय मंत्रिमंडळात ठरलेमहत्त्वाच्या घडामोडी या नेहमीच्या सदरांचाही अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

0000

 राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कायदेशीर तरतुदीस अनुसरूनच

                                                                          ·         अल्पसंख्याक विकास विभागाचे स्पष्टीकरण

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर करण्यात आलेली मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती ही प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरूनसर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तसेच वक्फ अधिनियमातील तरतुदीस अनुसरुनच करण्यात आली आहेअसे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागामार्फत करण्यात आले आहे.

            या नियुक्त्या विहित प्रक्रिया पार न पाडता केल्या गेल्याचा आरोप झाल्याने तसेच यासंदर्भात माध्यमांमध्ये उलट-सुलट माहिती प्रसिद्ध झाल्याने वस्तुस्थिती मांडण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

            वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती विषयीच्या तरतुदी वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २३ (१) अन्वये विहित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य वक्फ मंडळाने शिफारस केलेल्या विहीत दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या नावांच्या पॅनलमधून एका अधिकाऱ्याची राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करावयाची असते. महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील नियम क्रमांक ७ (१) (ब) मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्तीच्या वेळेस उपसचिव दर्जापेक्षा कमी दर्जा धारण करीत नसलेल्या सुयोग्य सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पुनर्नियुक्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्याची तरतूद आहे. वक्फ अधिनियम १९९५ व महाराष्ट्र वक्फ नियम २००३ मधील या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने त्यांच्या १५ मार्च २०२१ च्या पत्रान्वये सं. छ. तडवीसहसचिव व अनिस शेखसेवानिवृत्त उपसचिव या दोन नावांच्या पॅनलची महाराष्ट्र शासनास शिफारस केली होती. शिफारशीनुसार या दोन नावांच्या पॅनलमधून महाराष्ट्र शासनाने १९ मार्च २०२१ च्या शासन अधिसूचनेन्वये अनिस शेखसेवानिवृत्त उपसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्तीने ३ वर्षाच्या कालावधीकरिता नियमित नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदीस अनुसरुनसर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन करण्यात आली आहेअसे स्पष्ट करण्यात आले आहे.

            तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तीबाबतही स्पष्टीकरण करण्यात आले आहे.  राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने निश्चित करण्याचे वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला अधिकार प्राप्त आहेत. यामधील तरतुदीनुसार राज्य वक्फ मंडळाला महाराष्ट्र शासनाचे पूर्वमान्यतेने राज्य वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांची १०६ इतकी संख्या निश्चित केली असून या १०६ पदांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा देखील समावेश आहे. राज्य वक्फ मंडळाने या १०६ पदांचे सेवाप्रवेश नियम त्यांच्या २७ जून २०१८ च्या अधिसूचनेन्वये राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. या नियमातील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या किमान पाच वर्षे इतका अनुभव असलेल्या व उर्दू भाषेचे पुरेसे ज्ञान असलेल्या मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येते. श्री. फा. नु. पठाणकक्ष अधिकारीअल्पसंख्याक विकास विभाग हे ही पात्रता धारण करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक विकास विभागाच्या 28 ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही नियुक्ती प्रचलित कायदेशीर तरतुदींस अनुसरून व सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करण्यात आली आहेअशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

००००




जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता

 प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई दि. 18 : क्रीडा व युवकसेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरीता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20 व सन 2020-21 या दोन वर्षाकरीता 2 युवक, 2 युवती आणि 2 संस्था असे एकुण 6 पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत

(अ) युवक व युवती पुरस्कार -

 (1) पुरस्कार वर्षाच्या 1 एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय 13 वर्ष पूर्ण असावे तसेच 31 मार्च रोजी वय 35 वर्षाच्या आत असले पाहिजे.

 (2) अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग 5 वर्षे वास्तव्यात असला पाहिजे.

(3) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतपत्र कात्रणेप्रशस्तीपत्रेचित्रफित व फोटो अर्जासोबत जोडावेत.

(4) केंद्रराज्यनिमशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीविद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 (ब) संस्था युवा पुरस्कार

(1) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था पुढील पाच वर्षे कार्यरत पाहिजे.

 (2) संस्था सर्वजनिक विश्वास्त अधिनियम 1860 मुंबई किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० अंतर्गत नोंदणीबद्ध असावी.

(3) गुणांकणाकरीता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणेप्रशस्तीपत्रे,

चित्रफित व फोटो जोडावेत.

            वरील प्रमाणे पुरस्काराकरीता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालय वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, 2 रा मजलाधारावी बसडेपो जवळधारावी (प)मुंबई-400017 येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 8459585841 यावर संपर्क साधावा, असे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000


 

'दिलखुलासकार्यक्रमात

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "दिलखुलास" या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण विनायक महामुनी यांची 'नागरी सेवेतील महाराष्ट्रया विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व 'न्यूज ऑन एअरया अॅपवर शनिवारदि. २० नोव्हेंबर आणि सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत विनायक महामुनी यांनी देशात ९५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीरअभ्यासासाठी पुस्तकांचा वापरराज्यातच राहून परीक्षेची तयारी आणि परीक्षेसाठी इंग्रजी हा घटकमुलाखतीची तयारीमुलाखतीचा अनुभव आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. महामुनी यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

000

 


 सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक

राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

·        सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक कामाचे सादरीकरण

 

            मुंबईदि. 17 :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केले. जातधर्मपंथप्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीयप्रशासकीयन्यायदानाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. दूरदृष्टीच्या शासकजगातल्या सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमातांनी केलेले कार्य अलौकिक आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे आणि गौरव वाढवणारे असले पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचे काम आकर्षकदर्जेदार झाले पाहिजेअशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली.

            सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आले.  उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीव्दारे)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीव्दारे)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरीबाळासाहेब पाटील (बंडगर)बाळासाहेब शेवाळेश्रावण भावरस्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णीवास्तुविशारद दिनकर वराडेकाशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले कीराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अलौकिक आहे. राजमातांनी देशभरात रस्ते बांधले घाटमंदिरेधर्मशाळापाणपोयी उभारल्या. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांनी देशभरात उभारलेल्या बारवातलावविहिरी या स्थापत्य कलेचे आदर्श उदाहरण आहे. राजमाता अहिल्यादेवी या सर्वकालीन आदर्श स्त्री राज्यकर्त्यादूरदृष्टीच्या प्रशासक आहेत. त्यांनी केलेले कार्य राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शकपुढील पिढ्यांना प्रेरणादायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेले स्मारक भावी पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देईल. प्रेरणा देईल. हे स्मारक पुढील शेकडो वर्षे दिमाखात उभे राहिले पाहिजे. स्मारकासाठी वापरण्यात येणारे दगडसामग्री ऐतिहासिक वास्तूंशी साधर्म्य सांगणारी असली पाहिजेत. स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करावी. स्मारकात उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन दिसेल असा उत्तराभिमूख उभारावा. स्मारकाची निर्मिती दर्जेदार पध्दतीने व्हावीस्मारकाची निर्मिती करताना प्रत्येक बाब बारकाईनेकाळजीपूर्वक नियोजनपूर्वक करण्यात यावी. स्मारक भव्य आणि आकर्षक असले पाहिजे. अहिल्यादेवींच्या अलौकिक कार्याचे प्रतिबिंब स्मारकात दिसले पाहिजेअसी अपेक्षा व्यक्त करतानाच या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअशी ग्वाहीहीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली.

००००

फोटो ओळ :-

            सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाचा आराखडा आणि कामाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस (व्हिसीद्वारे)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे (व्हिसीद्वारे)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य रविकांत हुक्केरीबाळासाहेब पाटील (बंडगर)बाळासाहेब शेवाळेश्रावण भावरस्मारक समितीचे कार्यकारी अभियंता गिरीश कुलकर्णीवास्तुविशारद दिनकर वराडेकाशिनाथ वराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

००००


फोटो ओळ :

            राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने (फेस्कॉम) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चार लाख रूपयांचा धनादेश मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळेमुख्यालय उपाध्यक्ष विजय औंधेकोकण विभाग अध्यक्ष शा. गो. पाटीलमुंबई अध्यक्ष शरद डिचोलकरसंस्थेचे सचिव विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

००००


 

अमरावती खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी विनय कुमार सिन्हा

           

            मुंबईदि. 17 : श्री. विनय कुमार सिन्हा यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. विनय कुमार सिन्हा यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 28 ऑक्टोबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्तअमरावती खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.   

०००००



माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         गुरूवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

          निवडणूक आयोग दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविते. हा कार्यक्रम नेमका कायमतदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्यावर निवडणूक कार्यालयाकडून साधारण काय प्रक्रिया केली जातेहा पुनरिक्षण कार्यक्रम साधारण किती कालावधीचा असतोदरवर्षी होणाऱ्या मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणाचे लोकशाही सक्षमीकरणात महत्वतरुण मतदारांच्या जागृतीसाठी काय प्रयत्न केले जातात1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेच्या निमित्ताने मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री. देशपांडे यांनी  'जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

0000



 इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 18 नोव्हेंबरपासून

आवेदनपत्रे स्वीकारली जाणार;

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत

- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 17- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीतअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

            परीक्षेस नियमितपुनर्परीक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषयआयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थीआयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 10 डिसेंबर ते सोमवार दि. 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबर ते मंगळवार दि. 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तरमाध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार दि. 18 नोव्हेंबर ते गुरूवार दि. 30 डिसेंबर 2021 असा आहे.

            माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार दि. 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाहीअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000


 

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

               - पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

            मुंबईदि. 17 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

             मंत्रालयात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. ए. पातूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणालेराज्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून यामाध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थीचीसंख्या कमी आहेत. खाजगी क्षेत्रातील पशु वैद्यकीय पदवीधर उमेदवारांची वाढती मागणी लक्षात घेता खाजगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करुन खाजगी महाविद्यालये सुरु करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी सकारात्मक विचार

            महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील कुशल, अर्धकुशल व अकुशल रोजंदारी/ कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठाकडून वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे  नियमित करण्याकरिता  सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

0000



 

Featured post

Lakshvedhi