Friday, 3 September 2021

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या

मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्सबलून उडविण्यास प्रतिबंध

            मुंबईदि. 02 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्सबलूनउंच जाणारे फटाकेहलक्या वस्तूपतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या  लँडींगटेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 21 ऑगस्ट ते 19 ऑक्टोबर 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

            याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग)विमानाच्या उ्डडाणात (फ्लाईट)उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडचण आणण्याची घटना लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

            मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारीबृहन्मुंबईएस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

 अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित झाल्याने राज्य उजळणार;

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकार देणार विविध सवलती

- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

·       धोरण अंमलबजावणी कार्यपद्धतीला मंजुरी

            मुंबईदि. 2 : अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याची आणि त्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्याची यंत्रणा तात्काळ उभारण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

            अपारंपरिक ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जा(मेडा) ला नोडल एजंसी नियुक्त करण्यात आले आहे.

            भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारावर भर देण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या धोरणाची वेगवान अंमलबजावणी व्हावी आणि या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना जमीन व आवश्यक इतर मान्यता लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीला ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

            सन 2025 पर्यंत राज्यात 17 हजार 385 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने निश्चित केले असून त्यासाठी दरवर्षी किती प्रकल्प उभारणारकिती लक्ष्य साध्य करणारयाबद्दल नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या धोरणाची मिशन मोडवर वेगवान अंमलबजावणी करा,असे निर्देशही त्यांनी दिले.

            या संदर्भात वीज कंपनीच्या एचएसबीसी बिल्डिंग मुंबई येथील कार्यालयात डॉ. राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेमहानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारेमहाऊर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरेमहावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईतसंचालक ( वाणिज्य) सतिश चव्हाणमराविमं सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्षात 17 हजार 385 मेगावॅट इतकी अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट अपारंपरिक ऊर्जा धोरण 2020 मध्ये ठरविण्यात आले आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच कृषीपंपांना दिवसा 8 तास वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.

            अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याने विकासक व प्रकल्पधारक यांना प्रकल्प आस्थापित करण्याचा मार्ग सुलभ होऊन प्रकल्प उभारणीचे काम जलद गतीने उभारण्यास मदत होणार आहे. ही कार्यपद्धती तयार करण्यासाठी ऊर्जा विभागाने सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा केली आहे.

            या धोरणाची अंमलबजावणी करताना राज्यातील गुंतवणूकदार संस्था वा कंपन्या यांना प्राधान्य द्याऑनलाईन डॉक्युमेंट मॅनेजमेंट प्रभावीपणे करा असेही निर्देश त्यांनी दिले. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या उद्योजकाना उत्पन्नाची खात्री मिळावी म्हणून त्यांना दरांची हमी देण्यासाठी महावितरणतर्फे राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे विनंती केली जाणार आहे.

            अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून स्वस्त विजेची निर्मिती होत असल्याने नजिकच्या काळात राज्यात विजेचे दर कमी होणार असून यामुळे उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. तसेच क्रॉस सबसिडीचा भार कमी झाल्याने औद्योगिक विजेचे दर कमी होतीलअसा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

 मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

 

            मुंबईदि. 3 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांची क्षमता मतदार जागृतीसाठी उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेतअशी माहिती प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

            श्री. देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवीस्वीप सल्लागार दिलीप शिंदेबृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर उपस्थित होते.

            यावेळी श्री. देशपांडे म्हणालेलोकशाही सुदृढबळकट करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. निवडणूका यशस्वीपणे आयोजित करणे ही जशी महत्त्वाची बाब आहेत्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी मतदार शिक्षणप्रशिक्षण आवश्यक असून या बाबीकडे भारत निवडणूक आयोगाने सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (स्वीप) कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे. मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे या दोन महत्त्वाच्या बाबींकडे आम्ही लक्ष देत आहोत.

            गणेश मंडळांनी सामाजिक जाणीवेतून चांगले काम केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृतीचा चांगला संदेश जनतेपर्यंत जाऊ शकेल हे ओळखून आम्ही उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आखला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंधने पाळत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे.

            प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावटगणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्येनातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणीवगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावतानाजातधर्मपंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणेपैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणेकोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावणे आदीं विषयांवरघरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.

            या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमतसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. त्यामध्येही अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहेअसेही श्री. देशपांडे म्हणाले.

            18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी महत्त्वाची बाब असून त्यासाठी राज्यातील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेची जागृती करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येत्या शिक्षक दिनी दि. 5 सप्टेंबर रोजी लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेअशीही माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

·        राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

           

            मुंबईदि. 3 :  कोरोना काळात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS ) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणालेकोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी, पोलीस मित्रआरोग्य मित्रमहसूल मित्र म्हणून  काम केले आहे. तसेच रक्तदान शिबीरजनजागृती अभियानपरिसर निर्जंतुकीकरण गरजूंना मास्क वाटपभोजनाची व्यवस्थाअन्न वाटपऔषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.

            सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण 37 एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहेअसेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

            राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावाअसे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            यावेळीप्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णीएनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभूप्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाडएनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाईकार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिकसिनेट सदस्यपुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.

00000


 

"महा आवास अभियान-ग्रामीण" पारितोषिक वितरण

विकासयोजना राबविताना कोकण विभाग राज्यात अग्रेसर

                                                              -विभागीय आयुक्त विलास पाटील

            नवी मुंबई, दि.03 : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकासयोजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. कोकण विभाग शासकीय विकासयोजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.

            “महा आवास अभियान-ग्रामीण" अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोकण भवन येथे "महा आवास अभियान-ग्रामीण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील अध्यक्षजिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण अध्यक्षजिल्हा परिषद पालघरश्रीम. योगिता पारधीमा अध्यक्षजिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत अध्यक्षजिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.ठाणेश्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघरश्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगडश्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रत्नागिरीश्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.सिंधुदुर्गश्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास)श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य)श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल)श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना)श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघर श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगड/प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणाठाणेश्री.माणिक दिवे प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणापालघरश्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणासिंधुदुर्ग  आदि मान्यवर उपस्थित होते.

            पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आयुक्त श्री.विलास पाटील म्हणाले कीकोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करतांना आयुक्त श्री.पाटील म्हणाले कीविकासकामे करतांना जिल्हा परिषदपंचायत समिती व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते.

            आगामी गणेशोत्सव लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत.  लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

            सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण " राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्ह्याला मिळाली आहेत.

 पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे

            प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणेद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्गतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.

             सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगडद्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोलीजि.प.रत्नागिरीतृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळजि.प.सिंधुदुर्ग,

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघरद्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरीजि.प.पालघरतृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडीजि.प.सिंधुदुर्ग,

            प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत वाडोसता.कुडाळजि.प.सिंधुदुर्गद्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोमता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्गतृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळेता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्ग.

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणावता.कुडाळजि.प.सिंधुदुर्गद्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत मांगवलीता.वैभववाडीजि.प.सिंधुदुर्गतृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोलीता.पालघरजि.प.पालघर.

            प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना - सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हारजि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडाजि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणूजि.पालघर.

            प्रधानमंत्री आवास योजना-शासकिय जागा उपलब्धता- प्रथम क्रमांक-तहसिलदारता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदारता.शहापूरजि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक,

कोकण  विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत चिंचवलीता.भिवंडीजि.प.ठाणे.

            प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकमग्रा.पं. मुणगेता.देवगडजि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.

अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 अशियाना ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.

            या  पुरस्कार वितरण सोहळयास पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारीतसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक/ग्रामविकास‍ अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त वित्तीय संस्था आणि जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न केलेले तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. कोरोना नियम पाळून पारितोषिक वितरण कार्यक्रम करण्यात आला.

 राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा

असे नाव देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबेप्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरेप्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसेकोषाध्यक्ष शाम वानखेडेआयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदेप्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटीललोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकेशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्तावमार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.

            संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंतीपुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कलासाहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू... चिंता करू नका लवकर बरे व्हा

हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार

 

          ठाणे,दि.3 (जिमाका) : ताईतुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू...तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

          फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

          यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेतुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी करु नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर बरे व्हाराज्य शासन आपल्या पाठीशी आहेअसा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हाअसे सांगत मुख्यमंत्र्यांनी श्रीमती पिंपळे यांची विचारपूस केली.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून श्रीमती पिंपळे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून श्रीमती पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. श्रीमती पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईलअसे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

0000


 *एकटे असताना हदयविकाराच्या झटका आल्या आल्या ने स्वता करवायचे उपाय*


*काही दिवसांपूर्वी, मॉर्निंग वॉक वरून परतल्यावर प्रसिद्ध क्रिकेटपटू यशपाल शर्मा ह्या 1983 च्या वर्ल्ड कप खेळाडूचे वयाच्या 66 व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे खालील काही टिप्ससह तयार राहा. ज्यामुळे तुमचे आयुष्य वाचू शकते.*


  *ह्या टिप्स, डॉ. गीता कृष्णस्वामी यांच्या आहेत. कृपया तुमची 2 मिनिटे द्या, हे वाचा:*


 *१.  समजा संध्याकाळी 7.25 वाजले आहेत.   तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणाहून घरी परतत आहात (अर्थातच एकटे).*


  *२.  तुम्ही खरोखर थकलेले, अस्वस्थ आणि निराश आहात.*


 *3 अचानक तुम्हाला तुमच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागतात. ज्या तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या जबड्यात ओढू लागतात.  तुम्ही तुमच्या घराजवळील हॉस्पिटलपासून फक्त पाच किमी अंतरावर आहात.*


  *4.  दुर्दैवाने तुम्हाला माहित नाही की तुम्ही ह्या वेदना तीतपर्यंत सहन करू शकाल का.*

  *५.  तुम्हाला सीपीआरचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पण ज्याने हा कोर्स शिकवला त्याने, हे स्वतःसाठी कसे वापरावे हे शिकवलेले नाही.*


  *6.  एकटे असताना हृदय विकाराच्या झटक्याचे आक्रमण कसे रोखायचे?*  


 *हृदयविकाराचा झटका आल्यावर एकटे असल्यावर व मदतीशिवाय असल्यावर,   चेतना गमावण्यापूर्वी  त्याच्याकडे फक्त 10 सेकंद शिल्लक असतात.*


*7.  तथापि, त्या व्यक्तीने वारंवार आणि अतिशय जोमाने खोकल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.      यासाठी, प्रत्येक खोकल्याआधी एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि खोकला खोल आणि दीर्घकाळ असावा, जसे छातीच्या आतून थुंकी निर्माण करताना होतो तसा. मदत येईपर्यंत किंवा हृदयाला पुन्हा सामान्यपणे धडधडल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत प्रत्येक दोन सेकंदात एक श्वास आणि खोकला न सोडता त्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.*


  *8.  खोल श्वासांमुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन येतो आणि खोकल्याच्या हालचाली हृदय पिळून घेतात व रक्त संचारण ठेवतात.  हृदयावर वाढणारा दबाव देखील सामान्य लय परत मिळवण्यास मदत करतो.  अशा प्रकारे, हृदयविकाराची व्यक्ती रूग्णालया पर्यंत पोहोचू शकते.*


 *9.  सर्व लोकांना, शक्य तितक्या लवकर याबद्दल सांगा.  ह्या मुळे त्यांचे आयुष्य वाचवू शकते !!*


  *10.  कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की, जर प्रत्येकाने  हा मेल 10 जणांना पाठवला तर  किमान एक जीव वाचू शकतो.*


  *11.  विनोद पाठवण्यापेक्षा, कृपया ... हा मेल फॉरवर्ड करून योगदान द्या. ज्या मुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.*


  *12.  जर हा संदेश तुमच्या आजूबाजूला आला तर ... एकापेक्षा जास्त वेळा ... कृपया चिडचिड करू नका ... त्याऐवजी तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुमचे अनेक मित्र आहेत जे तुमची काळजी करतात आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा सामना कसा करावा याची आठवण करून देत राहतात.*


 *कृपया तुम्ही जमेल तितक्या लोकांना हा अत्यंत महत्वाचा संदेश शेअर करा.   जीव वाचवण्यात मदत करा.*

🙏🏻🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi