Friday, 3 September 2021

 मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

 

            मुंबईदि. 3 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांची क्षमता मतदार जागृतीसाठी उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेतअशी माहिती प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

            श्री. देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवीस्वीप सल्लागार दिलीप शिंदेबृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर उपस्थित होते.

            यावेळी श्री. देशपांडे म्हणालेलोकशाही सुदृढबळकट करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. निवडणूका यशस्वीपणे आयोजित करणे ही जशी महत्त्वाची बाब आहेत्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी मतदार शिक्षणप्रशिक्षण आवश्यक असून या बाबीकडे भारत निवडणूक आयोगाने सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (स्वीप) कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे. मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे या दोन महत्त्वाच्या बाबींकडे आम्ही लक्ष देत आहोत.

            गणेश मंडळांनी सामाजिक जाणीवेतून चांगले काम केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृतीचा चांगला संदेश जनतेपर्यंत जाऊ शकेल हे ओळखून आम्ही उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आखला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंधने पाळत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे.

            प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावटगणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्येनातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणीवगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावतानाजातधर्मपंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणेपैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणेकोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावणे आदीं विषयांवरघरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.

            या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमतसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. त्यामध्येही अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहेअसेही श्री. देशपांडे म्हणाले.

            18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी महत्त्वाची बाब असून त्यासाठी राज्यातील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेची जागृती करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येत्या शिक्षक दिनी दि. 5 सप्टेंबर रोजी लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेअशीही माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi