सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 9 August 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्य संग्रामातील
वीरांना ऑगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन
कोरोनाला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 9 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिना निमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना अभिवादन केले आहे. तसेच कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहनही केले आहे.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, मुंबईतील गवालीया टँकवर 'करेंगे या मरेंगे' अशी प्रतिज्ञा घेऊन ब्रिटीशांना 'चले जाव..! भारत छोडो !' असा निकराचा इशारा देण्यात आला. क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. या संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन करूया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपलं घर- कुटुंब, परिसर, वाडी-वस्ती, गाव-शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा घेऊया, त्यासाठी आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
0000
Sunday, 8 August 2021
*🌿अडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती🌿*
अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.
औषधी गुणधर्म:
अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.
विविध रोगांवर उपचार:
क्षय रोग:
आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खाडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे.
एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.
खोकला:
अडूळसाची सात पाने पाण्यामध्ये उकळवावी, ती गाळून घेतल्या नंतर त्यात २४ ग्राम मध मिसळावे. हा काढा घेतल्याने खोकला थांबतो. तसेच अडुळसा ची फुले टाकून तयार केलेली मिठाई दर वेळी 12 ग्राम या प्रमाणे सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास खोकला थांबतो. ६० ग्राम फुले १८० ग्राम गुळाच्या पाकात मिसळून ही मिठाई तयार करावी.
पोटातील जंत:
पाने, खोड आणि मुडाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी 1 चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा.
जुलाब आणि आव:
जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस 2 ते 4 ग्राम घ्यावा.
त्वचारोग:
ताज्या जखमा, संद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पानाचे पोटीस लावले. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.
*🌺वापरण्याची पद्धत आणि प्रमाण:🌺*
पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेडी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण 2 ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
*( कॉपी पेस्ट )*
*आरोग्य अणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला.*
https://chat.whatsapp.com/EnPzcxplpwj27Wj3J1Fq8m
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...