Wednesday, 5 June 2019

ही कविता लिहिणाऱ्याला लाखो सलाम


कसे आहात ?
मजेत !
मी ?
मी पण मजेत !

अरे वा काय कमाल आहे ?
मी मजेत
तुम्ही मजेत
मग दुःखी कोण आहे ? 

दुःखी ?
कुठंय कोण दुःखी ?
या एका प्रश्नावर
सारी जनता मुकी !

दुःख कुणी सांगत नाही
हेच मोठं दुःख
सुखी मात्र कुणीच नाही 
एवढं मात्र पक्क !

दुःखाला वाटते
हसण्याची भीती
रोज सोबत राहून सुद्धा 
माणसं राहतात रीती !

एकमेकाचा रितेपणा
घालवावाच लागेल
तरच माणूस चार दिवस
मजे मध्ये जगेल  !

बोलता बोलता हासलं की 
डोळ्यात येतं पाणी 
मग बघा दुःखाचीही
होतात गोड गाणी 

कुणाच्याही दुःखाची
करू नका टिंगल
दुसऱ्याला हासल्यावर
कसे होईल मंगल ?

आपल्या बद्दल इतरांना
विश्वास वाटला पाहिजे
"आतलं दुःख सांगताना"
आधार वाटला पाहिजे 

काळजाच्या कपारीतली
सल सांगत जावी 
वेदना कमी करण्यासाठी 
फुंकर घालत जावी 

मग बघा माणसं कशी 
आपसूक जवळ येतात
एकमेकाच्या दुःखाला 
अलगद कवेत घेतात 

इथे मजेत राहण्याचा
एकच उपाय आहे
मन मोकळं करण्यासाठी 
माणूस हवा आहे!!!

व्हॉट्सअॅप वरील मूर्ख लोकांची लक्षणे एकदा नक्की वाचा

मूर्ख –
फ्री मध्ये बॅलन्स, मोबाइल, pendrive, T-shirt मिळेल. असे मेसेज फॉरवर्ड करणारे. (फक्त लिंक वर क्लिक करा आणि क्लिक करतच रहा व नेटपॅक संपवा. शिवाय या वस्तू कधीच कोणाला भेटल्या नाहीत.)

काही वेडे –
ही मुलगी हरवली आहे हिला हिच्या घरी पोहचवा. या मध्ये कुठेही तारखेचा उल्लेख नसतो, मुलीच्या आई वडिलांचा फोन नंबर / पत्ता नसतो. फोन नंबर असलाच तर लागत नसतो. आला मेसेज की लागले फॉरवर्ड करायला…!

अतीवेडे –
ॲक्सिडेंटच्या बातम्या/फोटो पाठवतात, जे की दोन तीन वर्षाआधी झालेले असतात. यात कधीच तारीख नसते. आयुष्यभर फॉरवर्ड करतात.

बावळट –
 कोणत्याही देवाचा फोटो, संदेश , पत्ते, 108 वेळा लिहा, १२१ वेळा लिहा असे लिहून, फॉरवर्ड नाही केले तर वाईट बातमी मिळेल अशी धमकी देऊन लोकांना फॉरवर्ड करायला सांगाणारे. काय हो, देव कृपाळू आहे, त्याला व्हिलन का बनवताय ?

मंदबुद्धि –
 “पुजारी मंदिरात पूजा करत होता नंतर एक साप/ माकड आला आणि त्याने माणसाचे रूप घेतलं” हा मेसेज पाठवा लॉटरी लागेल. (अरे मूर्खा, तुझीच नाही लागली तर आमची काय लागणार?)

काही दीड शहाणे –
 आताच जन्माला आलेल्या मुलाच्या गळ्यात पिन फसली आहे ऑपरेशनला 50 लाख लागणार. बायपास 10 लाखात होते. कोणत्या ऑपरेशनला 50 लाख लागतात भाऊ?

अती शहाणे –
 अशाच प्रकारे भावूक, हृदयद्रावक मेसेज टाकून सांगतात की फॉरवर्ड करा. यामुळे प्रति शेअरिंग 50 पैसे व्हॉट्सअप कडून मिळतील. कधी मिळणार? कसे मिळणार ?कोण व्हॉट्सअप चा माणूस पैसे आणून देणार…? ऑफिस कुठं आहे व्हॉट्सअप चं, माहित आहे का ? 

बेअक्कल –
 “मेसेज पुढे पाठवा बॅटरी फुल चार्ज होईल किंवा कुलूप उघडेल (म्हणजे physics नावाची काही गोष्ट आहे की नाही?)

जडबुद्धी –
 एखाद्याचे महत्वाचे डॉक्यूमेंट सापडले आहेत . हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. (अरे, डॉक्यूमेंट वर त्याचा पत्ता आणि नंबर नाही का? ते आधी नीट बघा.)

अजून काही वेडेपणा –
आज दुपारी 12:30 to 3:30 यावेळेत काॅस्मो किरणे मंगळावरुन पृथ्वीवर प्रवेश करणार आहेत. यावेळेत तुमचा मोबाईल शक्यतो स्विच आॅफ ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा कारण काँस्मो किरणे खुपच घातक ठरु शकतात अस NASA नी BBC NEWS वर थोड्या वेळापूर्वी जाहीर केलंय. म्हणजे जणू काही हे येडं BBC हे english channel रात्रंदिवस पाहत असतं. आणि हे असे मेसेज पोस्ट करून वर सांगितात….
जास्तीत जास्त शेयर करा किंवा हा मेसेज सगळ्या ग्रुप वर पाठवा. लगेच पाठवा (जसं काही सगळ्या जगाची काळजी या मूर्खांवरच पडली आहे. )

तेव्हा, फालतू मेसेज पाठवून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा वेळ वाया घालवू नका आणि मोबाईलला कचरा पेटी नका बनवू….!

बोधकथा

‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय?

एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता. 

त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत.

ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत. 

त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.

कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता. 

शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
.
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.
.
तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
.
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.

मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली....

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!

आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,

पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.

एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा..सोडून द्या..
बघा काय चमत्कार होतो ते..!

मी आहे नां...!!!

आपल्या आयुष्यांत आलेली 
माणसं ही कांही उगांच 
आलेली नसतात...

प्रत्येक गोष्टीमागं कांहीतरी 
कारण असतं... 

कुणाचं, कुणाशीतरी, कांहीतरी
ऋणानुबंध जुळलेले असतात..!!

अन्यथा आपल्या सव्वाशे कोटी 
लोकसंख्येच्या देशांत नेमक्या 
याच व्यक्तींशी आपली ओळख 
कां होते...? याचं उत्तर कोणीही
देऊ शकत नाही...!!

जी नाती तयार होतात, ती 
आपण जीवापाड जपावी. 
कारण, आपल्या जगण्यासाठी 
ज्या प्राणवायूची गरज असते, 
तो प्राणवायू म्हणजे ही आपली
माणसं... 

रक्ताच्या नात्यांना कांही चॉईस 
नसतो. पण, मैत्रीच्या नात्यांत 
तसं नसतं...It's mutual 
relation... मन जुळलं, की 
मैत्री होते...

जे बंध खूप स्ट्रॉंग असतात, ते 
कोणाच्याही सांगण्यानं किंवा 
विपरीत परिस्थितीत कधीच 
तुटत नाहीत...!! 

आपण खूप वाईट परिस्थितीतून
जात असतांना मित्राचे किंवा 
मैत्रिणीचे " मी आहे नां एवढे
शब्द संजीवनी सारखे कां
वाटतात...? 

अगदी प्रत्यक्ष नाही, पण  
अप्रत्यक्ष सोबत असणं,
खूप सकारात्मक ऊर्जा
देणारं असतं...!! 

पैशांनी श्रीमंत होणं, खूप
सोपं आहे हो... पण,
नात्यांनी समृद्ध होणं,
तितकंच कठीण...!!!

श्रीस्वामी समर्थ...!! 

आईने मोजलेच नाही...

आयुष्याच्या तव्यावरती 
संसाराची पोळी
भाजता भाजता 
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...

नवर्‍यासह लेकराबाळांचे 
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले ,          
आईने  मोजलेच नाही...

जरा चुकले की 
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली ,   आईने  मोजलेच नाही...

याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी 
किती जगले ,आईने
मोजलेच नाही...

पाखरे गेली फारच दूर 
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर,
आईने मोजलेच नाही..

*स्मिता मोहरीर यांना काव्यांगण प्रतिष्ठान वणी च्या वतीने बेटी फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार*

*स्मिता मोहरीर यांना काव्यांगण प्रतिष्ठान वणी च्या वतीने बेटी फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार* 

*महाराष्ट्रभरातुन नामांकीत व्यक्तीमत्वास आणि कलत्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करुन हे पुरस्कार देण्यात येत असतात* 
या पुरस्कारासाठी नांदेडच्या  सौ.स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर यांची  निवड झाली आहे. हा पुरस्कार 9 जून 2019 रोजी त्यांना वणी जि. यवतमाळ येते देउन सत्कार करण्यात येणार आहे. या आधी त्यांना राज्यस्तरीय क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले पुरस्कार, संत जनाबाई काव्य रत्न पुरस्कार,यशस्विनी पुरस्कार,समाजसेविका दुर्गाताई देशमुख गौरव पुरकाराने आणि आर.बी.फिल्म प्रोड्युकॅशन चा जीवन गौरव लेखन पुरकाराने सन्मानित झाल्या  आहेत. स्मिता मोहरीर ह्या लेखिका,कवियत्री तसेच दोन लघुचित्रपटाच्या दिग्दर्शिका सुद्धा आहेत.

Tuesday, 4 June 2019

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 21 ते 26 वयातील युवकांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019 सुरू केला आहे. या कार्यक्रमात 45000 इतके महिन्याचे वेतन देखील दिले जाते.  ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 जून 2019 आहे. अर्ज करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in

Featured post

Lakshvedhi