मूर्ख –
काही वेडे –
अतीवेडे –
बावळट –
मंदबुद्धि –
काही दीड शहाणे –
अती शहाणे –
बेअक्कल –
जडबुद्धी –
अजून काही वेडेपणा –
तेव्हा, फालतू मेसेज पाठवून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा वेळ वाया घालवू नका आणि मोबाईलला कचरा पेटी नका बनवू….!
फ्री मध्ये बॅलन्स, मोबाइल, pendrive, T-shirt मिळेल. असे मेसेज फॉरवर्ड करणारे. (फक्त लिंक वर क्लिक करा आणि क्लिक करतच रहा व नेटपॅक संपवा. शिवाय या वस्तू कधीच कोणाला भेटल्या नाहीत.)
काही वेडे –
ही मुलगी हरवली आहे हिला हिच्या घरी पोहचवा. या मध्ये कुठेही तारखेचा उल्लेख नसतो, मुलीच्या आई वडिलांचा फोन नंबर / पत्ता नसतो. फोन नंबर असलाच तर लागत नसतो. आला मेसेज की लागले फॉरवर्ड करायला…!
अतीवेडे –
ॲक्सिडेंटच्या बातम्या/फोटो पाठवतात, जे की दोन तीन वर्षाआधी झालेले असतात. यात कधीच तारीख नसते. आयुष्यभर फॉरवर्ड करतात.
बावळट –
कोणत्याही देवाचा फोटो, संदेश , पत्ते, 108 वेळा लिहा, १२१ वेळा लिहा असे लिहून, फॉरवर्ड नाही केले तर वाईट बातमी मिळेल अशी धमकी देऊन लोकांना फॉरवर्ड करायला सांगाणारे. काय हो, देव कृपाळू आहे, त्याला व्हिलन का बनवताय ?
मंदबुद्धि –
“पुजारी मंदिरात पूजा करत होता नंतर एक साप/ माकड आला आणि त्याने माणसाचे रूप घेतलं” हा मेसेज पाठवा लॉटरी लागेल. (अरे मूर्खा, तुझीच नाही लागली तर आमची काय लागणार?)
काही दीड शहाणे –
आताच जन्माला आलेल्या मुलाच्या गळ्यात पिन फसली आहे ऑपरेशनला 50 लाख लागणार. बायपास 10 लाखात होते. कोणत्या ऑपरेशनला 50 लाख लागतात भाऊ?
अती शहाणे –
अशाच प्रकारे भावूक, हृदयद्रावक मेसेज टाकून सांगतात की फॉरवर्ड करा. यामुळे प्रति शेअरिंग 50 पैसे व्हॉट्सअप कडून मिळतील. कधी मिळणार? कसे मिळणार ?कोण व्हॉट्सअप चा माणूस पैसे आणून देणार…? ऑफिस कुठं आहे व्हॉट्सअप चं, माहित आहे का ?
बेअक्कल –
“मेसेज पुढे पाठवा बॅटरी फुल चार्ज होईल किंवा कुलूप उघडेल (म्हणजे physics नावाची काही गोष्ट आहे की नाही?)
जडबुद्धी –
एखाद्याचे महत्वाचे डॉक्यूमेंट सापडले आहेत . हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. (अरे, डॉक्यूमेंट वर त्याचा पत्ता आणि नंबर नाही का? ते आधी नीट बघा.)
अजून काही वेडेपणा –
आज दुपारी 12:30 to 3:30 यावेळेत काॅस्मो किरणे मंगळावरुन पृथ्वीवर प्रवेश करणार आहेत. यावेळेत तुमचा मोबाईल शक्यतो स्विच आॅफ ठेवा आणि शरीरापासून दूर ठेवा कारण काँस्मो किरणे खुपच घातक ठरु शकतात अस NASA नी BBC NEWS वर थोड्या वेळापूर्वी जाहीर केलंय. म्हणजे जणू काही हे येडं BBC हे english channel रात्रंदिवस पाहत असतं. आणि हे असे मेसेज पोस्ट करून वर सांगितात….
जास्तीत जास्त शेयर करा किंवा हा मेसेज सगळ्या ग्रुप वर पाठवा. लगेच पाठवा (जसं काही सगळ्या जगाची काळजी या मूर्खांवरच पडली आहे. )
तेव्हा, फालतू मेसेज पाठवून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा वेळ वाया घालवू नका आणि मोबाईलला कचरा पेटी नका बनवू….!
No comments:
Post a Comment