यावेळी मंत्री मुंडे म्हणाल्या, चिंचोळी काटी औद्योगिक परिसरात १.५ एमएलडी क्षमतेचा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला असून ३६ उद्योगांनी मिळून तो उभारला आहे. या प्रकल्पावर ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणाली कार्यरत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावर लक्ष ठेवत आहे. संबंधित उद्योगांमधून निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी टँकर किंवा नलिकेद्वारे या प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी विभागाकडून मागविलेल्या अहवालात शेतीचे नुकसान झाल्याचे आढळले नाही. तसेच आरोग्य विभागाच्या अहवालातही दूषित पाण्यामुळे माणसांना किंवा जनावरांना हानी झाल्याचे नमूद नाही.
मात्र तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्या. घातक कचऱ्याच्या व्यवस्थापनात त्रुटी, सीसीटीव्हीची अनुपस्थिती, पाणी नियोजनाचा अभाव, सीईटीपी योग्य प्रकारे न चालणे तसेच साठवण क्षमतेपेक्षा जास्त साठा आढळल्याने संबंधित कंपन्यांना नोटिस देण्यात आल्या असून त्यांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment