राज्य मानवाधिकार आयोगाच्या शिफारशी वेळेत अंमलात आणण्यासाठी
नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
- राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि.१७ : राज्य मानवाधिकार आयोगाच्या शिफारशींची कालबद्ध कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र हेड आणि ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
सभागृहात आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
No comments:
Post a Comment