Wednesday, 7 January 2026

. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका बजावू शकतात

 भारत हा युवकांचा देश आहे. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका बजावू  शकतातअसा विश्वास व्यक्त करून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारताचा विकास फक्त आर्थिक किंवा भौतिक उन्नतीपुरता मर्यादित नसूनसंस्कृतीसभ्यतापरंपरा व नैतिक  मूल्यांचे जतन हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंब मानणारी विचारधारा ही भारताची ओळख असून भारताने संत-महात्म्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश जगभर पोहोचविला असल्याचेही राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणालेदेश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून
स्टार्टअप्सआत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असूनतिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भरसमृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी
 अपयश आल्यास खचून न जाता परिश्रमचिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.

या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi