Saturday, 17 January 2026

भारतीय पोशाखाचा असाही गौरव

 भारतीय पोशाखाचा असाही गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळी जगभरातून आलेल्या सायकलपटूंचे मंचावर स्वागत करत होतेत्यावेळी सर्वांच्या नजरा सायकलपटूंच्या पोशाखावर खिळल्या होत्या. कुर्तापायजमा आणि त्यावर जॅकेट... असा आपल्याकडच्या महोत्सवी पोशाखात सगळे खेळाडू उठून दिसत होते. या क्षणाने भारतीय संस्कृतीचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित झाला. विविध भाषादेश आणि संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सायकलिस्ट एकाच पारंपरिक वेशात मंचावर उभे राहिलेले दृश्य हे केवळ औपचारिक स्वागत नव्हतेतर वसुधैव कुटुंबकम् या भारतीय विचारधारेचे जिवंत दर्शन होते.

कुर्ता,पायजमा आणि त्यावर जॅकेट या पोशाखातून भारतीय परंपरेचा सन्मान राखत या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी आपुलकीने कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे भारतीय संस्कृतीआदरातिथ्य आणि जागतिक स्तरावर संवाद साधण्याची क्षमता ठळकपणे पुढे आली. खेळाच्या माध्यमातून संस्कृतींची सांगड घालणारा हा प्रसंग उपस्थितांसह जगभरातील प्रेक्षकांसाठीही स्मरणीय ठरला.

0000 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi