‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशा रितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करण्याचे असे आवाहन केले.
जगभरातील किमान ३५ देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे, तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून, कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment