Saturday, 17 January 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा भव्य शुभारंभ

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ केवळ स्पर्धा नसून

पुढील पिढ्यांसाठी टिकणारा वारसा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि. १७ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे येथील जेडब्लू मेरियट हॉटेल मध्ये आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळसायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.

पुणे जिल्हा हा इतिहाससंस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेयेथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्यपरंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञानमॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असूनपश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य  स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल. या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणालेस्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असूनपर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi