परिचर्या संचालनालयासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण,
नगरविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार
-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि. १२:- परिचर्या संवर्ग हा आरोग्य सेवेचा आत्मा असून परिचर्या सेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. परिचर्या संचालनालय स्थापन करण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.
याबाबतची बैठक विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा सदस्य उमा खापरे यांनी व्यक्त केली. सभापती राम शिंदे यांनी ही बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले.
No comments:
Post a Comment