राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे या विषयी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
राज्यात ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य, शहरी भागात नगरविकास आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यात परिचर्या संचालनालय स्थापन करणे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
आरोग्य सेवेत परिचर्या सेवेला अधिक महत्व असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने परिचर्या संवर्गाबाबत स्वतंत्र बैठक घेतली असून या संवर्गासाठी स्वतंत्र संचालक देण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचेही मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment