मंत्री सामंत म्हणाले, या रस्त्याचे कामास शिवडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकल्प बाधित लोकांच्या तसेच एल्फिस्टन परिसरातील प्रकल्प बाधित लोकांच्या पुनर्वसन प्रक्रियेच्या कामामुळे विलंब झाला.
या रस्त्याच्या कामामुळे ८३ कुटुंब बाधित होत असून त्यापैकी ३ कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार आर्थिक मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या उर्वरित कुटुंबांचे त्याच परिसरात म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱ्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment