सर्व वित्तीय निकष पाळूनच निधीची तरतूद
नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर
- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 11 :- खर्चावर कठोर नियंत्रण, काटेकोर आर्थिक शिस्त, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. जीएसटी, उत्पादन शुल्कसह खनिकर्म विभागांद्वारे राज्याचा महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. कोणताही वित्तीय निर्देशांक बिघडू न देता राज्याचा विकास वेगात ठेवणे हे आमचे धोरण आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेत सर्व वित्तीय निकषांचे काटेकोरपणे पालन करुनच निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना दिली.
No comments:
Post a Comment