संगमनेर येथे कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचे विशेष शिबिर
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. 10 : अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील इंदिरानगर भागातील नागरिकांच्या कन्फर्मेशन डीड नोंदणी पूर्ण करण्यासाठी पुढील तीन दिवसात विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. त्याचबरोबर ही नोंदणी करुन घेणे आवश्यक असताना ती न करणाऱ्या सह दुय्यम निबंधकाची बदली करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले
विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याबाबत नोंदणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले असताना संबंधित सह दुय्यम निबंधकांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. या प्रकरणी जाणीवपूर्वक टाळाटाळ झाली आहे का, याची नोंदणी महानिरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
No comments:
Post a Comment