नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करून चौकशी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
नागपूर, दि. 10 : नंदुरबार येथील जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना २०२० मधील शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यावर योग्य ती कार्यवाही झालेली आहे. तथापि त्यांच्या विरोधात सध्या असलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना निलंबित केले जाईल आणि त्यांच्यावरील तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, अभिजीत वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शालेय शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडी बाबत विशेष तपास पथक नेमण्यात आले असून या पथकाला चौकशीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या चौकशी अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. विभागातील गैरव्यवहार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment