महाज्योतीमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन -ऑफलाईन प्रशिक्षण;
टॅब-इंटरनेटचीही सुविधा
– मंत्री अतुल सावे
नागपूर, दि १४ : महाज्योतीमार्फत एकूण ११ अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने दिले जात असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
सदस्य राहुल कुल, विजय वडेट्टीवार, रणधीर सावरकर, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते.
No comments:
Post a Comment