Sunday, 14 December 2025

शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात अन्य राज्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेणार

 शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात अन्य राज्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेणार

-         शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

नागपूरदि. १३ :- राज्य शासन शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सर्वोच्च न्यायालयाने  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अन्य राज्यांनी याविषयी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली जाईलअसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य जयंत आसगावकर यांनी राज्यातील कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रेसत्यजित तांबे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणालेन्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाबाबत विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार राज्य शासन कार्यवाही करत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासन संवेदनशील आहे. या निर्णयानुसार अन्य राज्यांनी कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती प्राप्त झाल्यानंतर या माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी विधि व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला जाईलअसेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi