Sunday, 14 December 2025

बेवारटोला प्रकल्पाची कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार

 बेवारटोला प्रकल्पाची कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार

-         जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 

नागपूर दि.१३:- गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला (ता. साकोली) लघु सिंचन प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जातीलअसे जलसंपदा ( विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी बेवारटोला (जि. गोंदिया ता. साकोली) धरण प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितलेया प्रकल्पाची प्रकल्पीय सिंचन क्षमता १३१० हेक्टर असून त्यापैकी ९९५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे उर्वरित ३१५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी डाव्या कालव्यावरील टोयागोंदी, चांदसूरज आणि कोपालगड कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi